Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
सीसीटीव्ही फुटेज व प्राथमिक डेटाचा आधार घेत पोलिसांनी ऑफीस बॉयसह पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले असून ऑफीस बॉयनेच ही सुपारी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
Nashik Crime: नाशिकमध्ये एका सिमेंट व्यापाऱ्यावर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला करत दांड्याने डोक्यात जोरदार वार केला. धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्यामागे स्वतः पीडित व्यापाऱ्याच्या ऑफिस बॉयनेच त्याला लुटण्याची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. ऑफिस बॉयनंच सिमेंटमालकाला सुपारी दिल्याची घटना उघडकीस आली असून व्यापाऱ्याला गंभीर जखम झाल्याचं सांगितलं जातं आहे. नाशिक शहारातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक डाटाच्या आधारे ऑफीसबॉयसह पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीत एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून तीन जण अट्टल गुन्हेगार आहेत.
ऑफिस बॉय जयेश चंद्रकुमार वाघ , उदय राजेंद्र घाडगे, रोहित किशोर लोहिया, विराज कैलास कानडे , संकेत किशोर मंडलिक अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नक्की प्रकरण काय?
सिमेंट व्यावसायिक शारिखक शेख व दीपक खताळे यांच्यासह ऑफीस बॉय जयेश वाघ कारने महात्मानगर येथील पाण्याच्या टाकीजवळ आले होते. १७ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आले रोजी ही घटना घडली आहे. ते दिवसभरात झालेल्या व्यवसायाची दोन लाख रुपयांची रक्कम घेऊन कारमधून खाली उतरले. ऑफीस बॉय त्यावेळी कार पार्क करत होता
अनोळखी युवकांचा चाकूहल्ला
शारीख शेख व दीपक खताळे या सिमेंट व्यवसायिकांवर चार अनोळखी युवकांनी चाकू, लाकडी दांड्याने हल्ला केला. यावेळी मिरचीच्या पावडचाही वापर करण्यात आला हेाता. हल्ला करणाऱ्यांवर प्रतिकार केला असता संशयितांनी खताळे यांच्या डोक्यावर वार केले व शेख यांच्यावरही चाकूहल्ला केला. खताळे व शेख हे रोख रक्कम घेऊन शेजारच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पळाले असता हल्लेखोरांचा डाव फसला व त्यानंतर हे हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी दीपक खताळी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे पथकानं सुरु केला.
पोलिसांनी अज्ञात संशयितांना पकडले
सीसीटीव्ही फुटेज व प्राथमिक डेटाचा आधार घेत पोलिसांनी ऑफीस बॉयसह पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले असून ऑफीस बॉयनेच ही सुपारी दिल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिकच्या महात्मानगरमध्ये झालेल्या घटनेत हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी या संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील तीन जण अट्टल गुन्हेगार असून पोलिसांच्या रेकॉर्डप्रमाणे यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर यातील एक जण अल्पवयीन असल्याचं समोर आलंय. ऑफिस बॉय जयेश चंद्रकुमार वाघ , उदय राजेंद्र घाडगे, रोहित किशोर लोहिया, विराज कैलास कानडे , संकेत किशोर मंडलिक अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा:
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम