(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Crime News : बोगस टेलिकॉम एक्सचेंजमधून खंडणी मागणारे गजाआड; नांदेड पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
Nanded Crime News : सिमबॉक्स कार्यप्रणालीद्वारे समांतर टेलिकॉम एक्सचेंज चालवून खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दापाश नांदेड पोलिसांनी केला
नांदेड : सिमबॉक्स कार्यप्रणालीद्वारे समांतर टेलिकॉम एक्सचेंज चालवून खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दापाश नांदेड पोलिसांनी (Nanded Police) केला आहे. आंतरराज्य टोळीतील तीन जणांना नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील एका व्यापाऱ्याला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अज्ञात व्यक्ती मानसिक त्रास दिला जात असे. या फोन कॉलद्वारे त्यांच्याकडून खंडणीची मागणी करण्यात येत होती. या प्रकरणी व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्या नेतृ्त्वातत विशेष पथके तयार करण्यात आली. या घटनेचा तपास केल्यानंतर वेगवेगळे मोबाईल क्रमांक सिमबॉक्सचा वापर करुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कॉल करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपी सियाबुद्दीन अब्दुल रहेमान, जयेश अशोक बेटकर (दोन्ही आरोपी रा.दांडेली जि. कारवार, कर्नाटक), रशिद अब्दुल अजीज (रा.नोटटानविडन जि.मलपूरम, केरळ) या तिघांना अटक केली. या आरोपींकडून 10 सिमबॉक्स, एक हजार 244 सिमकार्ड, पाच राऊटर, पाच लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे आरोपी एअरटेल कंपनीच्या सिमकार्डचा वापर करुन सॉफ्टवेअरव्दारे जीएसएममध्ये रुपांतर करुन लोकांची फसवणूक करत होते. याद्वारे ते अनेकांची आर्थिक लूट करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
बनावट लग्न लावणारं रॅकेट, तरुणाकडून 3 लाख उकळले; आरोपी महिला एका मुलीची आई
मागील काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी बनावट लग्न लावून फसवणूक केल्याच्या घटना सतत घडत असल्याचे समोर आले आहे. अनकेदा गुन्हा दाखल झाल्यावर देखील या घटना काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आता बीड जिल्ह्यात सुद्धा अशीच घटना समोर आली असून, बनावट लग्न लावून तरुणाची 3 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे बनावट लग्न लावणारं रॅकेट सक्रीय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तर या प्रकरणी दोन एजंटसह महिलेच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लग्न लावून फसवणूक करणारी महिला आरोपी एका मुलीची आई आहे.