एक्स्प्लोर

Nagpur Crime : कधीच न घडलेल्या खुनाचा स्टॅम्प पेपरवर लिहिलेला कथित कबुली जबाब उघड करण्याची धमकी, दाम्पत्याने महिलेकडून 15 लाख रुपये उकळले

Nagpur Crime : स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरीसह खुनाचा कबुली जबाब असल्याचं सांगत कधीही न झालेल्या खुनाच्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत दाम्पत्याने एका महिलेकडून तब्बल 15 लाख रुपये उकळ्याचं समोर आलं आहे.

Nagpur Crime : 'एका व्यक्तीचा आपण खून केला आहे' असा मजकूर स्टॅम्प पेपरवर लिहून त्याखाली एका महिलेची स्वाक्षरी घेऊन तिला खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्या महिलेकडून 15 लाख रुपये उकळल्याची घटना नागपुरात (Nagpur) समोर आली आहे. याप्रकरणी नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी अमित तिवारी आणि रेणुका तिवारी या तिशीतल्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
अमित तिवारी हा सीताबर्डी बाजारात कपडे विकण्याचे काम करतो. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर आधीच खून आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. नागपूरच्या जरिपटका इथली एक महिला ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याने ती कर्जबाजारी झाली होती. त्यात तिने आपल्या भावाकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. हे एक लाख रुपये फेडण्यासाठी त्या महिलेने आरोपी अमित तिवारीची पत्नी रेणुका तिवारी हिच्याशी संपर्क साधला. पीडित महिला जेव्हा पैसे घ्यायला आली तेव्हा आरोपी दाम्पत्याने एका स्टॅम्प पेपरवर तिची सही घेतली. स्टॅम्प पेपरमध्ये काय लिहिलं आहे याकडे त्या पीडित महिलेने लक्ष दिले नाही. काही दिवसानंतर या स्टॅम्प पेपरवर "या महिलेने रेणुकाच्या चुलत सासऱ्याचा खून केला" असा मजकूर लिहिला असल्याचे आरोपी दाम्पत्याने तिला सांगितलं. स्टॅम्प पेपरवर पीडित महिलेची स्वाक्षरी असल्याने हा खुनाचा कबुली जबाब असल्याचे सांगत, कधीही न झालेल्या खुनाच्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत पीडित महिलेकडून वेळोवेळी पैसे उकळायला सुरुवात केली. 

वर्षभराच्या काळात आरोपी दाम्पत्याने पीडित महिलेकडून तब्बल 15 लाख रुपये उकळले. शेवटी आणखी पैसे देणं कठीण झाल्याने या महिलेने आपल्या घरी ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी या प्रकरणी तिवारी दाम्पत्याला अटक केली आहे.

मॅट्रिमोनियल साईटवरुन 15 महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या ठगाला बेड्या
सीताबर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लग्न करतो म्हणून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका ठगाला अटक केली होती. भिकन माळी असं आरोपीचं नावं आहे. भिकनला जुगार, सट्ट्याचे व्यसन असून तो अशाच प्रकारे महिलांची फसवणूक करुन पैसे घेतो आणि ते जुगारात उडवतो. तसंच भिकन विवाहित आहे आणि पत्नी व मुलांपासून वेगळा राहतो, अशी माहिती चौकशीतून समोर आली. भिकन मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करायचा. वेगवेगळ्या बहाण्याने त्यांना जाळ्यात अडकवून पैसे उकळायचा. त्याने 15 महिलांना चुना लावल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नामकरण झालं, ST महामंडळाचं ॲप 'छावा राईड' नावाने धावणार; मंत्री महोदयांनी सांगितला उद्देश
नामकरण झालं, ST महामंडळाचं ॲप 'छावा राईड' नावाने धावणार; मंत्री महोदयांनी सांगितला उद्देश
झेडपी, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत VVPAT मशिन नसणार; निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं
झेडपी, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत VVPAT मशिन नसणार; निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं
Kabutar Khana : देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने जैन समाज आनंदी, दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार
देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने जैन समाज आनंदी, दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार
कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, दिल्लीला रवाना
कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, दिल्लीला रवाना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नामकरण झालं, ST महामंडळाचं ॲप 'छावा राईड' नावाने धावणार; मंत्री महोदयांनी सांगितला उद्देश
नामकरण झालं, ST महामंडळाचं ॲप 'छावा राईड' नावाने धावणार; मंत्री महोदयांनी सांगितला उद्देश
झेडपी, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत VVPAT मशिन नसणार; निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं
झेडपी, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत VVPAT मशिन नसणार; निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं
Kabutar Khana : देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने जैन समाज आनंदी, दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार
देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने जैन समाज आनंदी, दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार
कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, दिल्लीला रवाना
कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, दिल्लीला रवाना
PM Kisan :  'या' तीन कारणांमुळं काही शेतकऱ्यांचे पीएम किसानचे 2000 रुपये थांबवले, केंद्र सरकारनं दिली अपडेट
तीन कारणांमुळं काही शेतकऱ्यांचे पीएम किसानचे 2000 रुपये थांबवले, केंद्र सरकारनं दिली अपडेट
आधी भाजप प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश; आरती साठेंच्या नेमणुकीनंतर वाद, पवारांचे सवाल
आधी भाजप प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश; आरती साठेंच्या नेमणुकीनंतर वाद, पवारांचे सवाल
Manoj Jarange : मुंबईत 29 ऑगस्टला जे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना थेट इशारा
मुंबईत 29 ऑगस्टला जे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना थेट इशारा
मोठी बातमी! ओला-उबरच्या धर्तीवर सरकारी अ‍ॅप येणार, ST महामंडळ चालवणार; परिवहन खात्याचा मोठा निर्णय
मोठी बातमी! ओला-उबरच्या धर्तीवर सरकारी अ‍ॅप येणार, ST महामंडळ चालवणार; परिवहन खात्याचा मोठा निर्णय
Embed widget