Nagpur Crime News : नामांकित शाळेतील शिक्षकाचा विकृतपणा; स्वच्छतागृहात गेलेल्या महिलांचे मोबाईलने तयार करायचा व्हिडीओ
Nagpur Crime : नागपुरात नुकतंच पार पडलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवात हा प्रकार समोर आला. या महोत्सवात आलेल्या महिला स्वच्छतागृहात असताना छुप्या पद्धतीने मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या एका विकृत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Nagpur Crime News : शिक्षक म्हटले की त्याने फक्त विद्यार्थ्यांवर संस्कार करणे अपेक्षित नसते तर समाजाला सकारात्मक, चांगली दिशा दाखवावी अशीही अपेक्षा असते. त्यामुळेच की काय शिक्षकांबद्दल समाजात आदराची भावना असते. मात्र, एका शिक्षकाने आपल्या विकृतीने शिक्षकी पेशाला काळीमा फासला आहे. स्वच्छागृहात गेलेल्या महिलांचे आपल्या मोबाईलने चित्रीकरण करून त्याचे व्हिडीओ तयार करणाऱ्या एका शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नागपुरात नुकतंच पार पडलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवात हा प्रकार समोर आला. या महोत्सवात आलेल्या महिला स्वच्छतागृहात असताना छुप्या पद्धतीने मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या एका विकृत आरोपीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी नागपूरच्या एका नामांकित शाळेतील शिक्षक आहे. 29 जानेवारी रोजी नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महिलांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहात काही महिला गेल्या होत्या. तेव्हा स्वच्छतागृहाच्या मागच्या खिडकीतून एक व्यक्ती मोबाईलद्वारे चित्रीकरण करत असल्याची शंका त्यांना आली. त्यांनी बाहेर येऊन ही माहिती पोलिसांना दिली. तेव्हा पोलिसांनी शोध घेतला असता चित्रीकरण करणारा आरोपी कुठेही दिसून आला नाही. काल संध्याकाळी पुन्हा एकदा एका महिलेने तशीच तक्रार दिल्यानंतर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला.
सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर तो आरोपी व्हीआयपी गेटच्या जवळ उभा असल्याचं आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये स्वच्छतागृह असताना अनेक महिलांचे चित्रीकरण मिळाले. त्यामुळे गेले तीन दिवस हा माणूस त्या ठिकाणी असलेल्या महिला स्वच्छतागृहात गेल्या असता छुप्या पद्धतीने चित्रीकरण करत असल्यास समोर आले आहे. पोलिसांनी मंगेश खापरे आरोपीला अटक केली असून त्याने ही चित्रीकरण कोणत्या उद्दिष्टाने केले आहे याची चौकशी केली जात आहे.
अंतर्वस्त्रात लपवून आणले 34 लाखांचे सोने, नागपूर विमानतळावर कारवाई
नागपूर (Nagpur) आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्कराचा प्रयत्न राज्य सीमा शुल्क विभागानं हाणून पाडला आहे. पकडण्यात आलेला नागरिक हा मूळचा केरळ येथील रहिवासी असून या नागरिकाला अटक (Crime) करण्यात आली आहे. तस्कराने छुप्या मार्गाने अंतर्वस्त्रात 549 ग्रॅम वजनाचे सोनं आपल्या सोबत आणले होते. कस्टम पथकानं गोपनीय माहितीच्या (Nagpur News) आधारे ही कारवाई केली असून तस्करी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 34 लाख रुपये इतकी असून तस्करानं शारजा इथून सोनं तस्करी करून आणले असल्याचे कबूल केले आहे.
या प्रवाशाने 25 जानेवारीच्या पहाटे नागपूर विमानतळावर पाऊल ठेवले. तस्करानं पहिल्यांदाच नागपुरात प्रवास करून सीमा शुल्क चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागपूर विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या सतर्क आणि दक्ष अधिकाऱ्यांच्या नजरेत त्याच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या. त्यानंत या तस्कराला आडवून अंगझडती घेण्यात आली आणि पुढील प्रक्रियेनंतर सोने जप्त केले.