एक्स्प्लोर

तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव

फिर्यादी महिलेने पोलिसात तक्रार दिली असून उल्हासनगर महानगर पालिकेत सन 2011 पासून मी कनिष्ठ लिपिक या पदावर नोकरीत आहे.

ठाणे : राज्यातील बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी काही बलात्कार व अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असताना आता चक्क महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांविरुद्ध पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी लगट केल्याचं पीडित फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. संबधित आयुक्त हे पीडित महिला कर्मचाऱ्याला केबिनमध्ये बोलावून कमेंट पास करायचे, तू छान दिसतेस, तुझे कपडे खूप छान आहेत, पीडित महिला कर्मचारी या अधिकाऱ्याला बोलायची तुम्ही माझे वरिष्ठ आहात तुम्ही असे माझ्याशी बोलू नका तरीही अधिकारी वारंवार कमेंट पास करत असल्याने अखेर महिलेच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार, उल्हासनगर महानगर पालिकेत सन 2011 पासून मी कनिष्ठ लिपिक या पदावर नोकरीत आहे. सध्या सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर कर्तव्य बजावत आहे. विशेष म्हणजे 20 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडेही ईमेलद्वारे त्यांनी तक्रार केली होती. त्यानुसार, मला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते, पण मी वैयक्तिक कारणास्तव हजर राहू शकले नाही, असे पीडित महिलेनं पिर्यादीत म्हटलं आहे. फिर्यादी महिलेचे पती उन्हासनगर महानगरपालिकेत ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. मात्र, 2010 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्याजागी सन 2011 मध्ये त्यांना कनिष्ठ लिपिक या पदावर अनुकंपा तत्त्वार नोकरीवर घेण्यात आले आहे. सन 2017 मध्ये निवडणूक कार्यालयीन विभागात काम करत असतांना पीडित महिलेची आरोपी आयुक्तांसोबत ओळख झाली होती. तेव्हापासूनच संबंधित अधिकारी माझ्याशी लगट करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते, असे फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच, 14 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजे गतवर्षी संबंधित महिलेने आयुक्तांविरुद्ध महापालिकेच्या संबधित विभागात तकार दिल्याचेही फिर्यादीत सांगितले आहे.   

आयुक्तांनी आरोप फेटाळले, खोटे आरोप केल्याचा दावा

दरम्यान, उल्हासनगर महापालिकेमध्ये झालेल्या जाहिरात घोटाळा लपवण्यासाठी आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे उल्हासनगर मनपा अतिरिक्त आयुक्तांनी म्हटलं आहे. घाटकोपर जाहिरात बोर्ड कोसळ्यानंतर उल्हासनगरमधील पंचशील जाहिरात एजन्सीला लाखो रुपयांचा दंड आकारल्यामुळे मनपा कार्यालयातील हितचिंतक सहकाऱ्यांनी मिळून हा गुन्हा दाखल करण्याचे काम केले असल्याचा आरोप देखील आयुक्तांनी केला आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Eid a milad 2024 Holiday: मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ICC Women's T20 World : Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमाABP Majha Headlines : 11.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Eid a milad 2024 Holiday: मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Embed widget