एक्स्प्लोर

Ravi Pujari | गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळवण्यास मुंबई पोलिसांना यश, अनेक गुंतागुंतीची प्रकरणं उघडकीस येणार?

गेल्या वर्षी रवी पुजारीचे (Ravi Pujari) आफ्रिकेतून प्रत्यार्पण करुन बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. आता त्याचा ताबा मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाला असून अनेक गुंतागुंतीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मुंबई: दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफिकेतील सेनेगलमधून प्रत्यार्पण करुन भारतात आणलेल्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळविण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. बंगळुरु येथील न्यायालयाने कोठडी मंजूर केल्यामुळे गुन्हे शाखेचे पथक कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेऊन आज सकाळी मुंबईत दाखल झाले. रवी पुजारीला नऊ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

रवी पुजारी याच्यावर मुंबईत सुमारे 49 गुन्हे दाखल असून अनेक बड्या आणि प्रसिद्ध व्यक्तींना त्याने खंडणीसाठी धमकावले आहे. त्याचा ताबा मिळाल्याने मुंबई पोलिसांना मिळाल्याने अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रवी पुजारीवर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची एकेकाळी सिनेमा आणि व्यापारी जगतात मोठी दहशत होती.

गुन्ह्याच्या विश्वात असा एकही गंभीर गुन्हा नसेल जो रवी पुजारीने केला नसेल. फक्त भारतामध्येच रवी पुजारीवर 200 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारी याच्याविरोधात मुंबईत सुमारे 49 गुन्हे दाखल असून त्यापैकी 26 गुन्ह्यांमध्ये 'मोक्का' लावण्यात आला आहे. 2016 मध्ये विलेपार्लेच्या गजाली हॉटेलबाहेर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने 7 जणांना अटक करून आरोपपत्र दाखल केलं आहे.

आरिब माजिदच्या जामिनाला एनआयएनं दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलं, मुंबई उच्च न्यायालयानं माजिदला दिलेला जामीन योग्यच

कोण आहे रवी पुजारी? रवी पुजारी हा मूळचा कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील मालपे येथे राहत होता. 1990 मध्ये त्याने गँगस्टर छोटा राजन टोळीसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:ची गुन्हेगारी टोळी बनवली. पुजारीने मुंबई, बंगळुरु आणि मंगळुरु येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक, बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींना खंडणीसाठी धमकावण्यास व हस्तकांमार्फत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्यास सुरुवात करुन आपल्या टोळीची दहशत निर्माण केली.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट आणि अली मोरानी यांच्या हत्येचा कट रचल्याचाही पुजारीवर आरोप आहे. मुंबई प्रमाणे देशभरात रवी पुजारी याच्यावर गुन्हे दाखल आहेत. परदेशात बसून रवी पुजारी आपल्या हस्तकांमार्फत भारतामध्ये टोळी चालवत होता. रवी पुजारी हा दक्षिण आफिका येथील सेनेगल पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. दोन वर्षांपूर्वी त्याला भारतामध्ये आणण्यात आले. सुमारे 90 पेक्षा अधिक गुन्हे कर्नाटकमध्ये दाखल असल्याने भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा प्रथम कर्नाटक पोलिसांना देण्यात आला.

जानेवारी 2019 मध्ये रवी पूजारीला सेनेगल पोलिसांनी एका सलूनमधून अटक केली होती. सेनेगल मध्ये रवी पुजारी अँथोनी फर्नांडिस या नावाने राहत होता, त्याची हॉटेल्सची चेन होती. 'नमस्ते इंडिया' असं त्याच्या हॉटेलचे नाव असून एकूण 9 हॉटेल्स रवी पुजारी चालवत होता.

बँक कर्मचारी असल्याचं सांगत केलं लग्न, मात्र तो करायचा बँकेत चोरी! पकडल्यावर मिळाला चोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
Ajit Pawar Vs BJP: अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'

व्हिडीओ

Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
Ajit Pawar Vs BJP: अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
Nashik Mahanagarpalika Election 2026: भाजप नेता बंडखोराला अर्ज माघारी घेण्यासाठी सोबत घेऊन गेला, पण प्रवेशद्वारात पाच मिनिटांतच खेळ फिरला, नेमकं काय घडलं?
भाजप नेता बंडखोराला अर्ज माघारी घेण्यासाठी सोबत घेऊन गेला, पण प्रवेशद्वारात पाच मिनिटांतच खेळ फिरला, नेमकं काय घडलं?
Chandrashekhar Bawankule: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट; शेती अन् पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ
चंद्रशेखर बावनकुळेंची लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट; शेती अन् पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ
Dhurandhar: 'धुरंधर'ची कमाई पहिल्यांदाच सिंगल डिजिटमध्ये; Box Office वर 29 दिवसानंतर दणका, 800 कोटींपासून किती दूर?
'धुरंधर'ची कमाई पहिल्यांदाच सिंगल डिजिटमध्ये; Box Office वर 29 दिवसानंतर दणका, 800 कोटींपासून किती दूर?
IND Squad vs NZ ODI Series : मोहम्मद शमी, गिल IN, पांड्या, बुमराह OUT...; न्यूझीलंडविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing XI
मोहम्मद शमी, गिल IN, पांड्या, बुमराह OUT...; न्यूझीलंडविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing XI
Embed widget