Drug Case : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतच्या भावाला अटक, 8 कोटींच्या केटामाईन प्रकरणी कारवाई
Drug Peddler Kamal Rajput : ड्रग्ज प्रकरणात कमल राजपूतला अटक करण्यात आली असली तरी त्याचा भाऊ कैलास राजपूत मात्र अद्याप फरार आहे.
मुंबई: आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतच्या (Kailas Rajput) भावाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) अटक केली आहे. कमल राजपूतला (Drug Peddler Kamal Rajput) वसईतून अटक करण्यात आली आहे. 7 कोटी 87 लाख रुपयांच्या केटामाईन ड्रग्ज प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेची (Mumbai Police) ही मोठी कारवाई समजली जातेय.
मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मार्च महिन्यात अंधेरीतून 7 कोटी 87 लाख रुपयांचे केटामाईन जप्त केले होते. तब्बल 15 किलो 743 ग्रॅम केटामाईनसह 57 लाख रुपयांची प्रतिबंधित औषधे देखील त्यावेळी जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात आधीच आठ आरोपी अटकेत आहेत. आता कमल राजपूतला अटक करण्यात यश आलं आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी कैलास राजपूत हा लंडनमध्ये असून अद्याप मुंबई पोलिसांच्या हाती यायचा आहे.
Drug Peddler Kailas Rajput : कैलास राजपूत लंडनमध्ये
देशातील सर्वात मोठा आणि कुख्यात ड्रग सप्लायर अशी कैलास राजपूत उर्फ केआरची ओळख आहे. कैलास राजपूत केवळ भारतातच नाही तर आखाती आणि युरोपीय देशांमध्येही अंमली पदार्थांचा व्यापार करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कैलास राजपूत 2014 पासून फरार आहे आणि भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर तो दुबईमध्ये जाऊन लपला. त्यानंतर तो जर्मनीला गेला आणि आता लंडनमध्ये लपला आहे. गेल्या वर्षभरातपासून मुंबई पोलीस लंडन पोलिसांच्या संपर्कात असून कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
भारतात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
कैलास राजपूतचा पासपोर्ट ब्रिटन सरकारने जप्त केला असल्याची माहिती आहे. त्याला नजरकैदेतही ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. भारतात एमडी ड्रग्जचा पुरवठा करण्यात कैलास राजपूतची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील ड्रग्ज सप्लायसंबंधित विविध केसमध्ये कैलास राजपूतचे नाव अनेकदा समोर आले आहे. मुंबई क्राईम ब्रँच, दिल्ली स्पेशल सेल, डीआरआय (DRI) आणि एनसीबी (NCB) यांसारख्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये कैलाश राजपूतवर अनेक गुन्हे दाखल आहेत. एजन्सींनी त्याच्याविरुद्ध एलओसी (LOC) देखील जारी केले आहे.
यापूर्वी कोविडपूर्व काळात तत्कालीन एएनसी प्रमुख शिवदीप लांडे, गुन्हे शाखा प्रमुख संतोष रस्तोगी यांनी कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. परंतु त्यानंतर कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे एजन्सी त्याला भारतात आणण्यात अपयशी ठरली होती.
कैलास राजपूत केवळ भारतातच नाही तर आखाती आणि युरोपीय देशांमध्येही अंमली पदार्थांचा व्यापार करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कैलास राजपूत 2014 पासून फरार आहे आणि भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर तो दुबईमध्ये जाऊन लपला. त्यानंतर तो जर्मनीला गेला आणि आता लंडनमध्ये लपला आहे.
ही बातमी वाचा: