एक्स्प्लोर

Mumbai : नवजात शिशूंची पाच लाख रुपयांना विक्री; बाळांची विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टरांसह टोळीला अटक, मुंबईत कारवाई

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटच्या मास्टरमाईंडसह आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई :  अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. यामध्ये एका बोगस डॉक्टराचाही (Bogus Doctor) समावेश आहे. ही टोळी नवजात बाळांची 5 लाख रुपयांना विक्री करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मुंबईतील (Mumbai) शिवाजीनगर गोवंडी (Shivaji Nagar Gowandi) भागात चालत असलेल्या अनधिकृत रहमानी नर्सिंग होमच्या माध्यमातून सुरू असलेल्या या बालक विक्री रॅकेटचा पर्दाफाश ट्रॉम्बे पोलिसांनी केला आहे.  पोलिसांनी दोन नवजात शिशूंची सुटका केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेली ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. बाळ विक्री प्रकरणात आता तिच्याविरोधात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. तुरुंगातून नुकतीच जामिनावर सुटली होती. ज्युलीया फर्नांडिस नवजात बाळांच्या विक्रीचे रॅकेट चालवत असे. 

रॅकेट कसे काम करायचे?

पोलिस तपास पथकातील सूत्रांनी सांगितले की, फर्नांडिस हिला यापूर्वी अशा सहा प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती. ती आयव्हीएफ केंद्रांसाठी डोनेटरची व्यवस्था करतो. IVF हे  प्रजननक्षमतेची समस्या असलेल्या लोकांना बाळ होण्यास मदत करण्यासाठी उपलब्ध अनेक तंत्रांपैकी एक आहे.  या केंद्रांद्वारे ती मुलाची गरज असलेल्या लोकांशी संपर्क साधत होती. त्यानंतर ती आपल्या एजंटांच्या मदतीने ती नवजात बाळाला विकू इच्छिणाऱ्या पालकांसोबत बोलणी करत असे आणि बाळांची विक्री करायची. 

फर्नांडिसने बाळाची गरज असलेल्या लोकांचा आणि ते विकणार असलेल्या पालकांचा शोध घेण्यासाठी तीन एजंट ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या तीन एजंट महिला आहेत. यामध्ये  गोरीबी उस्मान शेख, शबाना झाकीर शेख, गुलाबशा मतीन शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्याशिवाय, पोलिसांनी या रॅकेटची मास्टरमाईंड ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस, सायराबानो नबीउल्ला शेख यांना अटक केली आहे. त्याशिवाय, नवजात बाळाचा व्यवहार करणारी पालक  रिना नितीन चव्हाण हीलादेखील पोलिसांनी अटक केली.  यामध्ये सायराबानो नबीउल्ला शेख ही बोगस डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. 

गुन्हा दाखल... 

ट्रॉम्बे पोलिसांनी भा.दं.वि. कलम 370, 34 सह बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील कलम 81 आणि 87, तर, महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनयम 1961 मधील कलम 33 आणि 36 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी 5 दिवसांच्या आणि 45 दिवसांच्या दोन नवजात बालिकांची सुटका केली आहे. पोलिसांनी त्यांना देखरेखीसाठी स्वयंसेवी संस्थेकडे सोपवले आहे. 

या रॅकेटमध्ये महिलांची प्रसुतीदेखील अनधिकृत नर्सिंग होम मध्ये केली जात होती. बाळाच्या पालकांना बाळासाठी एक लाख रुपये देण्यात येत होते. तर, वैद्यकीय आणि इतर खर्च आरोपींकडून करण्यात येत असे. 

मास्टरमाईंड फर्नांडिस हीला जुलै 2022 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने अशाच प्रकरणांमध्ये अटक केली होती. वरळी येथील रहिवासी असणाऱ्या ज्युलीया फर्नांडिस हिच्यावर एकूण सात गुन्हे असून तिच्यावर वडाळा टीटी, ठाणे आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

फर्नांडिस ही एक अहम नावाची स्वयंसेवी संस्थादेखील चालवते. आता, या स्वयंसेवी संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी पोलिसांकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

पोलिसांचे नागरिकांना आवाहन...

पोलिसांनी नागरिकांना योग्य सरकारी संस्था आणि नियमांनुसार बाळांना दत्तक घेण्याचे आवाहन केले असून अशा बेकायदेशीर पद्धती टाळण्यास सांगितले आहे. बेकायदेशीरपणे बाळ दत्तक घेणे, त्यांची विक्री-खरेदी करणे गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget