Holi: होळी आधीच मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, कोट्यवधींच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक
होळी (Holi) सणापूर्वी मुंबई पोलिसांनी (mumbai police) कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांसह (Drugs) दोन गुन्हेगारांना अटक केली आहे.
Mumbai Police : होळी (Holi) सणापूर्वी मुंबई पोलिसांनी (mumbai police) कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांसह (Drugs) दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बिहारमधून मुंबईत ड्रग्ज पुरवण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा चरस मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांचे झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना मालाडच्या संतोष नगर भागातून अटक करण्यात आली आहे. सोमनाथ घार्गे म्हणाले की, हे आरोपी होळी सणाच्या निमित्ताने चित्रपटसृष्टी जगाशी संबंधित लोकांना चरस पुरवत असे. अटक करण्यात आलेले आरोपी बिहारचे रहिवासी आहेत.
तीन किलो चरस जप्त
मुंबई पोलिसांचे झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी पुढे सांगितले की, या आरोपींकडून त्यांना तीन किलोपेक्षा जास्त चरस मिळाली आहे. जप्त करण्यात आलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 30 लाख एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींनी चरसची ही मोठी खेप मुंबईत आणून त्याचे छोटे-छोटे भाग करत पॅकेटमध्ये टाकून चित्रपट कलाकारांना विकण्याची तयारी केली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याचं घार्गे यांनी सांगितलं.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून तीन किलोपेक्षा जास्त चरस आढळून आली. यानंतर आरोपी गौरव कुमार प्रसाद (19) आणि कृष्ण कुमार पंडित (26) यांच्यावर सायकोट्रॉपिक सबन्टन्स अॅक्ट 1985 (एनडीपीएस) कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या