एक्स्प्लोर

Crime News: मुंबई पुन्हा हादरली; गोरेगावात रिक्षातच महिलेवर अतिप्रसंग, आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या

Crime News: आरोपीनं महिलेला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिला धमकावलं. त्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरुन पळ काढला.

Mumbai Crime News: एका धक्कादायक घटनेनं मुंबई (Mumbai News) पुन्हा हादरली आहे. मुंबईतील गोरेगाव (Goregaon) आरे कॉलनी (Aarey Colony) परिसरात 20 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. रिक्षातच या तरुणीवर नराधमानं अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे.  पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आरोपीविरोधात भादंवि कलम 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली आहे. सर्वात आधी आरोपीनं महिलेला मारहाण केली आणि त्यानंतर तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. तसेच, घटला प्रकार कोणालाही सांगू नकोस, अशी धमकीही तरुणीला दिली. तसेच, इंद्रजित सिंह असं आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो मुंबईत रिक्षा चालवत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आरोपीनं तरुणीला धमकावल्यानंतर तरुणीनं भितीपोटी घडलेल्या प्रकाराची वाच्यता कुठेच केली नाही. साधारणतः काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेची प्रसूती झाली होती. पण घटनेच्या काही दिवसांनी महिलेला रक्तस्त्राव होऊ लागला. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत महिलेच्या सर्व चाचण्या करुन घेतल्या. त्यावेळी डॉक्टरांना तपासणी दरम्यान महिलेच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या. डॉक्टरांना संशय आला, त्यावेळी त्यांनी महिलेला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. त्यानंतर महिलेनं तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत डॉक्टरांना आणि कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांना घडला प्रकार समजताच त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्थानक गाठलं आणि गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सीबीडी बेलापूर येथे तिच्या मावशीच्या घरी गेली होती, तिथून तिनं घरी परतण्यासाठी नवी मुंबई ते गोरेगाव रिक्षा बुक केली. रिक्षा आरे कॉलनीत पोहचली, त्यावेळी रिक्षा चालकानं रिक्षा एका निर्जन स्थळी नेली. तिथे त्यानं आधी महिलेला मारहाण केली आणि त्यानंतर महिलेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. त्यानंतर नराधमानं महिलेला घडलेल्या घटनेबाबत कुठेच वाच्यता न करण्याबाबत धमकावलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं थेट उत्तर प्रदेश गाठलं. 

दरम्यान, पोलिसांनी पीडितेकडून संपूर्ण माहिती घेऊन तात्काळ आरोपीला शोध सुरू केला. सर्वात आधी पोलिसांनी रिक्षाच्या मालकाला गाठलं. त्यानंतर घटनेत्या दुसऱ्या दिवशीच चालक फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सर्व माहिती घेऊन आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या. काल (रविवारी) आरोपीला अटक करुन उत्तर प्रदेशातून मुंबईत आणण्यात आलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mitali Thackeray Mahim Vidhan Sabha : बायकोची नवऱ्याला खंबीर साथ, Amit साठी मिताली ठाकरे मैदानातDevendra Fadanvis Nagpur : लाल पुस्तक घेऊन अर्बन नक्षल्यांची मदत घेण्याची नौटंकी - फडणवीसSadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत मविआचे डुक्कर, कितीही साबण लावला तरी घाणीत जातंABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Embed widget