Mumbai Crime : मुलुंडमध्ये 33 वर्षीय तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करुन गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके, 34 वर्षीय आरोपीला बेड्या
Mumbai Crime : मुंबईतील मुलुंड परिसरात धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. एका 33 वर्षीय व्यक्तीवर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याच्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके दिल्याचा प्रकार घडला आहे.

Mumbai Crime : मुंबई (Mumbai) पूर्व उपनगरातील मुलुंड परिसरात धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 33 वर्षीय व्यक्तीवर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याच्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या अमानुष घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचं वय 33 वर्षे आहे आणि सुरेश आत्माराम म्हस्के (वय 34 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीनुसार, ही घटना 6 जुलै 2022 रोजी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान घडली होती. मुलुंड पश्चिम इथल्या हिंदुस्तान चौकासमोर चर्चच्या बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये आरोपीने त्याच्यावर अत्याचार केले.
पीडित तरुणाने आरोपी सुरेश म्हस्केला काही पैसे दिले होते. हे पैसे देण्यास आरोपी टाळाटाळ करत होता. पैसे कधी देणार अशी विचारणा पीडित तरुणाने सुरेशला केली. परंतु यानंतर सुरेश म्हस्केने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावरच तो थांबला नाही तर त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोग केला. इतकंच नाही तर पीडित तरुणाच्या गुप्तांगावर पेटत्या मेणबत्तीचे चटके दिले. शिवाय गुदवारांमध्ये प्लास्टिकचा पाईप टाकून त्याठिकाणी देखील पेटती मेणबत्ती घालून त्याला जबर दुखापत केली," अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तक्रारदार तरुणावर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यानंतर पीडित तरुणाने पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार कथन केला. त्याच्या तक्रारीवरुन मुलुंड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 326, 506 आणि 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मुलुंड पोलिसांनी सोमवारी (11 जुलै) रात्री आरोपी सुरेश म्हस्के याला अटक केली असून मंगळवारी (12 जुलै) त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
