एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबई महिलांसाठी सुरक्षित नाही! नूडल्सचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 42 वर्षीय शेजारी अटकेत

Mumbai Rape Case : मुंबईत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नूडल्सचं आमिष दाखवून 42 वर्षीय शेजाऱ्याने अत्याचार केला.

Mumbai Rape Case : मुंबई महिलांसाठी सुरक्षित नाही. दक्षिण मुंबईत (South Mumbai) एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर (Rape Case) अत्याचार झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने तीन मुलींना नूडल्सचं आमीष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

नूडल्सचं आमिष दाखवून 42 वर्षीय शेजाऱ्याकडून अत्याचार

आरोपीने शेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींनांच शिकार बनवलं. पीडित मुलींच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, आरोपी त्यांच्या शेजारी राहतो त्याने तीन मुलींना खाण्यापिण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेलं. तिन्ही मुली आरोपीच्या घरात पोहोचताच त्यानं दरवाजा बंद केला, जेणेकरून कोणतीही मुलगी घरातून पळून जाऊ नये. त्यानंतर त्याने तिन्ही मुलींवर अत्याचार केला.

पीडित मुलींनी आईला सांगितला घडलेला प्रकार

पीडितेच्या आईने पोलिसांना माहिती देत पुढे सांगितलं की, आरोपीने तिन्ही मुलींवर अत्याचार केला. जेव्हा मुली आरोपीच्या घरून आपल्या घरी परतल्यावर त्यांनी आईला घडल्या प्रकाराची माहिती दिली. मुलींनी हे सांगताच आईंना मोठा धक्का बसला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुलींनी सांगितलेली घटना ऐकल्यावर आईने जे.जे. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. जे.जे. मार्ग पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराडे यांनी एबीपीला माहिती देताना सांगितलं की, आईच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराडे यांनी पुढे सांगितलं की, आरोपीला अटक केल्यानंतर आम्ही त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 376, 367(ब), 377, 341 आणि पॉक्सो कलम 4, 5 आणि 12 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली अत्याचाराला बळी ठरल्या आहेत. नूडल्सचं आमिष दाखवून 42 वर्षीय शेजाऱ्याकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईला स्वप्ननगरी म्हटलं जातं. लाखो लोक स्वप्न घेऊन या शहरात येतात. पण येथे लहान मुलीसुद्धा सुरक्षित नसतील तर ही फार चिंतेची बाब आहे. अशा आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, हीच मागणी जनसामान्यांकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai News : मोठी बातमी! दहशतवादाचा कट उधळला? संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, NIA ने दिला होता धोक्याचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special ReportDevendra Fadanvis CM?|खुर्ची एक दावेदार अनेक,अजितदादांचा वादा शिंदेंना की फडणवीसांना? Special ReportSujay Vikhe Vs Balasaheb Thorat | टायगर अभी जिंदा है, थोरातांच्या शहरात येऊन सूजय विखेंनी कापला केकGunratna Sadavarte on Next CM| महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? गुणरत्न सदावर्ते म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Embed widget