एक्स्प्लोर

Mumbai Crime : मीरा रोडमध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला, हाताला दुखापत

Mumbai Crime : मीरा रोडमध्ये भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेश महिला प्रमुख सुलताना खान यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी रविवारी रात्री हल्ला केला आहे. यात सुलताना यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.

Mumbai Crime : मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील मीरा रोडमध्ये (Mira Road) भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेश महिला प्रमुख सुलताना समीर खान यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी रविवारी (17 जुलै) रात्री हल्ला केला आहे. यात सुलताना यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी जखमा झाल्या असून उपचार करुन त्यांना सोडण्यात आलं.

सुलताना काल रात्री त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त निघाल्या होत्या. एवढ्यात मीरा रोडमधील नया नगरजवळ दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत गाडीवर हल्ला केला. तसेच धारदार शस्त्राने सुलताना यांच्यावर हल्ला केला आणि तिथून पळ काढला. सुदैवाने यात फक्त सुलताना यांच्या हाताला दुखापत झाली. यावेळी सुलताना यांच्या पतीने आरडाओरडा केल्याने इतर नागरिक तिथे जमा झाले आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने त्यांच्या पतीने  त्यांना मीरा रोडच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथे त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले. त्याच्या हातावरील दोन जखमावर तीन टाके घातल्याचमं रुग्णालयाने म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुलताना खान फारच घाबरल्या आहेत. त्या जबाब देण्याच्या स्थितीत नाहीत. आज तिचा जबाब नोंदवला जाईल, असं सुलताना यांच्या पतीने सांगितलं. जबाब नोंदवून घेतल्यावर आरोपींवर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलीस म्हणाले.

दरम्यान सुलताना यांनी 4 जुलै रोजी फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. "आपल्याला मुंबईच्या पदाधिकाऱ्याकड़ून धमकी येत असल्याचा दावा सुलताना या व्हिडीओमध्ये करत आहेत. तसंच आपला पूर्वीचा व्हिडीओ कोणीतरी डिलीट केल्याचंही त्यांनी सांगितलं. "ना डरी हूं… ना डरुंगी," असं त्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील आरोपी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी अशाप्रकारे हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर महिलेच्या पतीने ही पक्षाची अंतर्गत बाब असल्याचा संशय व्यक्त केला असून सुलताना यांनी पक्षाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget