एक्स्प्लोर

Mumbai Crime : मुंबईत महिलांची सुरक्षा धोक्यात, धावत्या टॅक्सीमध्ये 14 वर्षीय गतीमंद मुलीवर अतिप्रंसंग, दोन नराधम अटकेत 

Mumbai Crime : दक्षिण मुंबईतील एक 14 वर्षांची गतीमंद मुलगी घरातून भांडून बाहेर पडली आणि टॅक्सीत बसल्यावर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. 

मुंबई: शहरात एका धावत्या टॅक्सीमध्ये 14 वर्षाच्या गतीमंद मुलीवर बलात्कार (Minor girl rape in Mumbai) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीचं पहिला अपहरण करण्यात आलं आणि नंतर तिच्यावर धावत्या टॅक्सीमध्येच बलात्कार करण्यात आला. अत्याचारानंतर नराधमांनी त्या मुलीला वाकोला भागात सोडलं. या प्रकरणी सलमान शेख (वय 26) आणि टॅक्सी चालक प्रकाश पांडे नावाच्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.  

या प्रकरणी त्या गतीमंद मुलीवर सलमान शेखने अत्याचार केले तर टॅक्सी चालक प्रकाश पांडे याच्यावर सलमानला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बलात्कार आणि बाल लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

Minor girl rape in Mumbai : घरच्यांशी भांडण करून मुलगी निघाली 

सूत्रांनी सांगितले की, पीडित मुलगी दिलेल्या जबाबानुसार दक्षिण मुंबईत तिच्या घराजवळून ती टॅक्सीत बसली. सोमवारी पहाटे 2:30 वाजता ती टॅक्सीतून निघाली आणि सूरज पांडे टॅक्सी चालवत होता. ती मालवणीला तिच्या चुलत बहिणीच्या घरी जात होती. टॅक्सी चालक पांडे तिला दादरला घेऊन गेला आणि तिथे सलमान शेख हा लॉज मालक टॅक्सीत बसला. त्यानंतर सलमानने तिच्यावर टॅक्सीत लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला वाकोला भागात सोडले. 

सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतीच्या आधारे नराधमांना अटक 

ही तरुणी परिसरात फिरत होती. त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली असता काही गैरप्रकार आढळून आल्याचा त्यांना संशय आला. पोलीस तिला ठाण्यात घेऊन गेले आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपीला अटक केली. या गुन्ह्यात मुख्य आरोपीला मदत केल्याप्रकरणी पांडेला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. य़ा प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

मुंबईत महिलांची सुरक्षा धोक्यात

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली जात आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षाही धोक्यात आल्याचं चित्र आहे. मुंबई पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक नसल्याचं दिसून येत आहे. त्याचमुळे या अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 

ही बातमी वाचा: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget