एक्स्प्लोर

Mumbai Crime: मोठी बातमी! म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीनं उचचलं टोकाचं पाऊल, पतीच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी जीव संपवला

Mumbai Crime: राज्यभरातून छळवणुकीवरून होणारया विवाहित महिलांच्या आत्महत्यांची प्रकरण ताजी असताना आता म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीनं टाेकाचं पाऊल उचचल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

Mumbai: मुंबईतील कांदिवलीतील आकुर्ली परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 44 वर्षीय रेणु कटरे यांनी राहत्या घरी गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली असून, पैशाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. (Mumbai Crime News)

नेमकं प्रकरण काय?

रेणु कटरे या शिक्षिका होत्या आणि पती बापू कटरे यांच्यासोबत आकुर्ली येथे राहत होत्या. स्थानिक माहितीप्रमाणे, दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वारंवार वाद होत असत. शनिवारी रात्रीही असाच काहीसा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही वेळातच रेणु यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर कटरे कुटुंबात हळहळ व्यक्त होत असली तरी या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. रेणु कटरे यांचे भाऊ अ‍ॅड. नितीन शेवाळ यांनी ही आत्महत्या नसून, हत्या असण्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी थेट पती बापू कटरे यांच्यावर गंभीर आरोप करत, बहिणीचा छळ केल्याचे म्हटले आहे. राज्यभरातून सध्या विवाहित महिलांचे छळवणूकीच्या कारणानं आत्महत्यांची प्रकरणं समोर येत असून म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीनं याच कारणातून टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांकडून तपास सुरु

या संपूर्ण प्रकरणाबाबत अ‍ॅड. नितीन शेवाळ हे समतानगर पोलिस ठाण्यात पोहोचले असून, त्यांनी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, समतानगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रेणु कटरे यांच्या मृत्यूमागील कारण नेमकं काय आहे, हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. मात्र, कुटुंबियांनी जो संशय व्यक्त केला आहे, त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Pune crime Rave Party: आधी रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडलं, नंतर प्रांजल खेवलकरांच्या हडपसरच्या बंगल्यावर छापा टाकला, पुणे पोलिसांच्या वेगवान हालचाली

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथिच व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथिच व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथिच व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथिच व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Embed widget