'मला तू आवडतेस...', मुलीला प्रपोज करणं अंगलट, रोड रोमिओला नागरिकांकडून चोप; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
नवी मुंबई : मुलीला प्रपोज करणं, नवी मुंबईतील एका रोड रोमिओला चांगलच अंगलट आलय. 'मला तू आवडतेस...', असं म्हणत मुलीला प्रपोज केलं.
नवी मुंबई : मुलीला प्रपोज करणं, नवी मुंबईतील एका रोड रोमिओला चांगलच अंगलट आलय. 'मला तू आवडतेस...', असं म्हणत मुलीला प्रपोज केलं. मात्र, त्यानंतर नागरिकांनी रोड रोमिओला चांगलाच चोप दिलाय. शिवाय, अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबईतील (Mumbai Crime) कळंबोलीमध्ये हा प्रकार घडलाय.
लोखंडे हा मागील दीड ते दोन महिन्यापासून त्रास देत होता
अधिकची माहिती अशी की, अल्पवयीन मुलीसमोर प्रेम व्यक्त करणं एका रोमियो चांगलंच महागात पडलं आहे. महेश लोखंडे असं रोमिओच नाव असून त्याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबोली येथे राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीला लोखंडे हा मागील दीड ते दोन महिन्यापासून त्रास देत होता. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही आरोपीने पीडित मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने त्रासलेल्या तरुणीने संबंधित बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली. आरोपीने मुलीची छेड काढत मला तू आवडतेस असं सांगितले. या वेळी मुलीच्या मागवर असलेल्या तिच्या वडिलांनी याबाबत संबंधित आरोपीला जाब विचारताच आरोपी तरुण एका दुकानात लपून बसला. यावेळी त्याला बाहेर काढून जमलेल्या गर्दीने चांगलाच चोप दिला. छेड काढल्या प्रकरणी महेश लोखंडेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कळंबोली पोलीसांनी अटक केली आहे.
मुलींच्या सुरक्षेबाबत पालक सतर्क
बदलापूर शहरात गेल्या महिन्यात 3 वर्षीय चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. बदलापुरातील संतप्त नागरिकांनी रेल्वे रोको देखील केला. जवळपास संपूर्ण एक दिवस बदलापूर रेल्वे स्थानकावर चक्का जाम आंदोलनही करण्यात आले होते. शिवाय संबंधित शाळेवरही कारवाई करण्यात आली आहे. या शाळेचा कार्यभार आता संस्थाचालकाकडे नसून त्या शाळेवर आता प्रशासक नेमण्यात आलाय.
दरम्यान, राज्यात बदलापूरच्या घटनेमुळे संतापाची लाट असताना अकोल्यातून आणखी एक घटना समोर आलीये. चॉकलेट आणि बिस्किटाचे अमिष दाखवून 3 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालक जागृत झाले असून नवी मुंबई आणि पुण्यात मुलींची छेड काढणाऱ्या मुलांना चोप देण्यात आलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
Kolkata Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातील चपाती-भाजी खाऊन वैतागला; अंडी आणि चाऊमीनची केली मागणी अन्...