Kolkata Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातील चपाती-भाजी खाऊन वैतागला; अंडी आणि चाऊमीनची केली मागणी अन्...
Kolkata Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याने तुरुंगातील जेवणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रात्रीच्या जेवणासाठी त्यानी अंडी आणि चाऊमीन मागितलं असल्याची माहिती आहे.
Kolkata Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय सध्या प्रेसिडेन्सी सुधारगृहात आहे. दरम्यान, संजय रॉय यानी तुरुंगात दिल्या जाणाऱ्या जेवणावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यूज 18 ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, संजय रॉय चपाती (रोटी) आणि भाजी खाऊन त्रस्त झाला आहे. त्याने अंडी आणि चाऊमीन मागितल्याची माहिती समोर आली आहे. (Kolkata Rape Case)
तुरुंगातील नियमांनुसार, सर्व कैद्यांना समान जेवण दिले जाते, जे प्रत्येकासाठी तयार केले जाते. या कारणामुळे तुरुंग व्यवस्थापनाने त्याची मागणी फेटाळली होती. चपाती (रोटी) आणि भाजी दिल्याने संजय रॉय भडकला, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर त्याने जेवण केले.
झोपण्यासाठी जादा वेळ मागितला
यापूर्वी, सीबीआय कोठडीतून सुधारगृहात बदली झाल्यानंतर संजय रॉय यानी झोपण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. तो स्वतःशी बोलतानाही दिसत होता. काही दिवसांनी तो पूर्वपदावर आला. आत्तापर्यंत कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाच्या तपासात एकच अटक करण्यात आली आहे आणि ती म्हणजे संजय रॉय, जो कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक आहे आणि त्याच्यावर बलात्कारानंतर हत्येचा आरोप आहे.
NHRC ने कोलकाता पोलिसांना नोटीस बजावली
कोलकाता पोलिसांनी 27 ऑगस्ट रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडितेला न्याय देण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर बळाचा वापर केला होता. याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) कोलकाता पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे. ओपी व्यास यांच्या तक्रारीनंतर एनएचआरसीने ही नोटीस जारी केली आहे.
व्यास यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरजी कार मेडिकल कॉलेज प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी 27 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी शांततापूर्ण निदर्शनादरम्यान आंदोलकांवर अत्याधिक आणि क्रूर बळाचा वापर केला. तक्रारीची दखल घेत NHRC ने म्हटले आहे की, जर आरोप खरे असतील तर शांततापूर्ण संमेलनाच्या अधिकाराचे उल्लंघन करणे ही गंभीर बाब आहे.(Kolkata Rape Case)
प्रकरण काय आहे?
9 ऑगस्ट रोजी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संजय रॉयला अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे डॉक्टरांनी देशव्यापी निषेध केला, पीडितेला न्याय द्यावा आणि महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील सर्व निवासी डॉक्टरांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करणारा कायदा करावा, अशी मागणी केली.