MP Crime : नोटीस मिळताच शिक्षकाचा संयम सुटला, शाळेतच पिस्तूल काढले, अधिकाऱ्यांना धमकी देण्यासाठी थेट कार्यालयातच पोहचला
MP Crime : संतप्त शिक्षकाने शाळेतच पिस्तूल काढून दुसऱ्या शिक्षकाला दाखवली. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावण्यास सुरुवात केली.
MP Crime : गुरू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यासाठी गुरू किंवा शिक्षकाचे स्थान अत्यंत मोलाचे असते. पण त्याच शिक्षकाचा जेव्हा स्वत:वरील संयम सुटतो, तेव्हा अनर्थ घडतो. असाच एक प्रकार मध्य प्रदेशात समोर आला आहे. सेगाव येथील सीएम रायझ स्कूलमध्ये नोकरीस असलेल्या एका शिक्षकाला नोटीस मिळाल्यावर त्याचा संयम सुटला. संतप्त शिक्षकाने शाळेतच पिस्तूल काढून दुसऱ्या शिक्षकाला दाखवली. एवढेच नाही तर शिक्षकाने BEO कार्यालय गाठले आणि तिथल्या अधिकाऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावण्यास सुरुवात केली.
शिक्षक तडकाफडकी निलंबित, एफआयआरही दाखल होणार
जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सीएम रायझ स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षक पराग सावळे यांच्याबाबत सतत तक्रारीं प्राप्त होत होत्या, यानंतर आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. गुरुवारी ही नोटीस शिक्षक सावळे यांना दिली असता ते संतप्त झाले आणि त्यांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. एवढेच नाही तर संतप्त झालेल्या शिक्षकाने गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठून तिथल्या अधिकाऱ्यांसमोरच पिस्तूल काढली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनाही धमकावले. मिळालेल्या माहितीनुसार, सेगाव येथील शासकीय सीएम रायझ स्कूलच्या परिसरातही शिक्षक सावळे यांनी पिस्तूल काढले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत आर्य यांनी प्राथमिक शिक्षक पराग सावळे यांना तडकाफडकी निलंबित केले. याप्रकरणी एफआयआरही दाखल होणार आहे.
शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात का आली?
या घटनेची माहिती आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत आर्य यांना मिळताच त्यांनी शुक्रवारी संबंधित शिक्षक सावळे यांना तत्काळ निलंबित करून भगवानपुरा कार्यालयात रुजू केले. शिक्षक प्रराग सावळे हे सतत एक महिना शाळेत वेळेवर न येणे, मद्यप्राशन करून येणे, संस्थेतील शिक्षकांशी गैरवर्तन करणे, दादागिरी करणे इत्यादी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.
कर्मचारी भीतीने थरथर कापू लागले
बहुतांश कर्मचाऱ्यांना या शिक्षकाची भीती वाटत होती, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी नोटीस देण्यासाठी कर्मचारी आल्यावर सावळे संतप्त झाले आणि त्यांनी पिस्तूल काढले. यामुळे शाळेतील सर्व कर्मचारी घाबरले. एवढेच नाही तर शिक्षकाने पिस्तुल घेऊन बीईओ कार्यालय सेगाव गाठले आणि बीईओला फोन करत पिस्तूल काढले. या प्रकरणाबाबत आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत आर्य यांनी सांगितले की, संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा>>>