एक्स्प्लोर

Crime : पत्नीला धडा, अपमानाचा सूड आणि 4 महिन्यांचा कट! लग्नाआधीच मुलाची हत्या करणाऱ्या बापाने पोलिसांना सांगितली आपबिती

Delhi Crime : पोलिसांनी आरोपी बापाला अटक करून चौकशी केली असता, त्याने जे काही केले ते योग्यच असल्याचे सांगितले. त्याला कसलाही पश्चाताप नाही

Delhi Crime : लेकाच्या नव्या आयुष्याची सुरूवात होत असतानाच कोणता बाप आपल्या पोटच्या गोळ्याचा खून करू शकतो? पण अशी एक घटना दिल्लीत (Delhi) घडलीय. 7 मार्चच्या रात्री देशाची राजधानी दिल्ली हादरली, या दिवशी असे काही हत्याकांड घडले, ज्याने लोकांना हादरवून सोडले. आपल्या तरुण मुलाच्या लग्नाच्या काही तास आधी चक्क वडिलांनी चाकूने धारदार हल्ला करून मुलाचा खून केला. त्यानंतर 50 लाखांचे दागिने आणि रोकड घेऊन पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता, त्याने जे काही केले ते योग्यच असल्याचे सांगितले. त्याला कसलाही पश्चाताप नाही. असं तो पोलिसांनी घेतलेल्या जबाबात म्हणाला.

 

50 लाखांचे दागिने, रोकड घेऊन पळून गेला

54 वर्षीय पित्याने लग्नाच्या काही तास आधी आपल्या 29 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपी बाप दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. या खळबळजनक खून प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक गोष्टी पोलिसांसमोर आल्या आहेत. आपल्यापासून वेगळं राहणाऱ्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी आरोपी पित्याने आपल्या जिम ट्रेनर मुलाची हत्या केल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. 6-7 फेब्रुवारीच्या रात्री 29 वर्षीय मुलगा गौरव सिंघल याची त्याचे वडील 54 वर्षीय रंगलाल सिंघल यांनी वार करून हत्या केली होती. गौरव सिंघल हा जिम ट्रेनर होता. त्याचे लग्न होणार होते. लग्नाच्या काही तासांपूर्वी तिच्या दक्षिण दिल्लीतील घरी त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर चाकूने 15 वार करण्यात आले. हत्येवेळी रंगलालसोबत अन्य तीन जणांचाही सहभाग होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी दिल्लीहून जयपूरला पळून गेला होता.

 

"हे सारं काही पत्नीला धडा शिकवण्यासाठीच" 

दक्षिण दिल्लीचे पोलीस अधिकारी अंकित चौहान म्हणाले की, आम्ही CCTV फुटेज आणि घटनेच्या इतर तपशीलांचे विश्लेषण केले, ज्यावरून असे दिसून आले की आरोपी रंगलाल घटना केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला होता आणि त्याने आपला फोन बंद केला होता. त्याला जयपूर येथून अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी रंगलालकडे 50 लाखांचे दागिने आणि 15 लाखांची रोकड होती, ज्या घेऊन तो घरातून पळून गेला होता. चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याचे पत्नी आणि मुलासोबतचे संबंध चांगले नव्हते. पत्नीला धडा शिकवण्यासाठीच त्याने आपल्या मुलाची हत्या केली आहे. आरोपीची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत आहे. आरोपीने तीन-चार महिन्यांपासून हत्येचा कट रचला होता, असे तपासात समोर आले आहे.

 

अत्यंत हुशारीने हत्येचा कट रचला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रंगलाल आणि त्यांचा मुलगा गौरव सिंघल यांच्यात बुधवारी रात्री जोरदार वाद झाला. यावेळी गौरवने त्याचे वडील रंगलाल यांना कानाखाली मारली होती, त्यामुळे रंगलालला खूप राग आला आणि त्यानंतर त्याने गौरवची हत्या केली. आरोपींनी अत्यंत हुशारीने हत्येचा कट रचला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी रंगलाल याने तीन जणांना कामावर घेऊन त्यांना 75 हजार रुपये दिले होते. खुनाच्या वेळी ते रंगलालसोबत होते.

 

आरोपी बाप पोलिसांसमोर म्हणाला - केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही

पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान रंगलालला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप झाला नाही. त्याने जे काही केले ते योग्यच असल्याचेही सांगितले. आरोपीने पोलिसांना सांगितले की, मुलगा ऐकत नाही, तो मनमानी करत असे आणि यामुळे तो नाराज होता. त्याच्या आईनेही गौरवला नेहमीच साथ दिली. चौकशीदरम्यान, आरोपी रंगलाल गेल्या तीन-चार महिन्यांपासून आपल्या मुलाची हत्या करण्याचा कट रचत होता, अशी माहितीही पोलिसांना मिळाली.

 

हेही वाचा>>>

Crime : सॉरी बाबा.. मी JEE करू शकत नाही... सुसाईड नोट लिहत विद्यार्थ्याची आत्महत्या, राजस्थानच्या कोटामधील सहावी घटना

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Digital Arrest : आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget