Chhattisgarh Naxal : सुरक्षा दलाच्या वाहनावर माओवाद्यांचा सशस्त्र हल्ला; आयईडी स्फोटात दोन जवान शहीद
Chhattisgarh Naxal : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्याती सिल्गर आणि टेकुलगुडम दरम्यान माओवाद्यांनी मोठा आयईडी स्फोट केलाय.
Chhattisgarh Naxal गडचिरोली : छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सुकमा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्याती सिल्गर आणि टेकुलगुडम दरम्यान माओवाद्यांनी (Naxal) मोठा आयईडी स्फोट केलाय. या स्फोटात दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जवान यात जखमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकीकडे सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी (Anti-Naxalite Campaign) अभियानाला मोठे यश मिळाले असताना, दुसरीकडे माओवाद्यांनी जवानांच्या ट्रकला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. नक्षलविरोधी (Anti-Naxalite Campaign) अभियानावर असलेल्या सुरक्षा राक्षकांवर हा हल्ला करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
माओवाद्यांनी जवानांच्या ट्रकला केले लक्ष्य, दोन जवान शहीद
201 कोब्रा वाहिनीची ऍडव्हान्स पार्टी जागरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीतील कॅम्प सिल्गर येथून आरओपी ड्युटी दरम्यान ट्रक आणि मोटारसायकलने कॅम्प टेकलगुडेमकडे जात होती. दरम्यान सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता. दरम्यान,आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास 201 कोब्रा कॉर्प्सच्या एक ट्रकवर आयईडी स्पोट घडवून आणला. ज्यामध्ये चालक आणि सहचालक जागीच शहीद झाले असून उर्वरित सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती आहे. यात शहीद जवानांची नावे विष्णू आर आणि शैलेंद्र अशी सांगण्यात येत आहेत. शहीद जवानांचे पार्थिव सध्या घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येत आहे. मात्र या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
माओवादी बनवत होते चक्क बनावट नोटा
दरम्यान, नुकतेच सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी (Anti-Naxalite Campaign) अभियानाला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चौहान यांनी प्रथमच या बाबत मोठा खुलासा केला आहे. सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानांतर्गत माओवादी चक्क बनावट नोटा बनवत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये बनावट नोटा बनवण्याचे साहित्य प्रथमच जप्त करण्यात आले. या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली असून हे मोठं यश पोलिसांना मिळाले आहे. परिणामी आता माओवादी संघटना आर्थिक संकटात संपडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
2022 पासून माओवादी बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण
छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या माओवादी विरोधी कारवाई मध्ये पोलिसांना बनावट नोटा बनवण्याचे साहित्य आढळून आले आहे. यात 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांचे नमुने आढळून आले आहे. पश्चिम बस्तर भागात 2022 पासून माओवादी बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण देत होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. प्रत्येक एरिया कमेटीच्या एक किंवा दोन सदस्यांना या बाबतचे प्रशिक्षण देण्यात आल्याचीही माहिती पुढे आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या