एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई, सापळा लावून मंगळसुत्र चोरांना ठोकल्या बेड्या; 10 गुन्हे उघडकीस

Chhatrapati Sambhaji Nagar : दोन्ही आरोपींकडून मंगळसुत्र जबरी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्या ताब्यातून 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar)  मंगळसुत्र चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान अशा मंगळसुत्र जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तर ताब्यात घेण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींकडून मंगळसुत्र जबरी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्या ताब्यातून 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. संतोष पांडुरंग इष्टके, (वय 29 वर्ष, रा. कायगांव, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर), निखील बाबासाहेब कुऱ्हे, वय 21 वर्ष, रा. मौजे राघु हिवरे, शनीशिंगनापुरचे जवळ, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे या दोन्ही आरोपींचे नावं आहेत. 

छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसापासुन मंगळसुत्र जबरी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने घडलेल्या घटनांचे विश्लेषण करुन छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या मंगळसुत्र जबरी चोरीच्या ठिकाणाचा आभ्यास केला. ज्यात सर्व घटनांमधील कार्यपद्धत ही एक सारखीच असल्याचे व मंगळसूत्र जबरी चोरी करणारे व्यक्ती हे एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपींना पकडण्यासाठी सपुर्ण शहरात सापळा लावण्यात आला होता. 

याचवेळी आज (8 जून) रोजी ए एस क्लब ते नगर नाका रोडवरील छावणी उड्डाणपूलाजवळून दोन संशयित व्यक्ती मोटार सायकलवर बसून शहरात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी दिलेले उत्तर ऐकून पोलिसांना संशय आला. त्यामुळे या दोन्ही संशयित तरुणांची चौकशी केली असता त्यांनी शहरात मंगळसुत्र जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे समोर आले. तर या दोन्ही आरोपींकडून मंगळसुत्र जबरी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्या ताब्यातून 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकुण 10 मंगळसुत्र 10 तोळे 05 ग्रॅम 360 मिली वजनाचे ज्याची किमत 6 लाख 30 हजार रुपये आहे. तर एक बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण 8 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्येमला जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस ठाणे एम वाळुज येथील 03, सातारा येथील 03, क्रांतीचौक येथील 02, पुंडलीकनगर येथील 01 व छावणी येथील 01 असे एकुण 10 मंगळसुत्र जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 

मंगळसूत्र वेगवेगळ्या सराफा विक्रेत्यांना विकले... 

विशेष म्हणजे या दोन्ही आरोपींनी चोरी केलेले मंगळसूत्र वेगवेगळ्या सराफा विक्रेत्यांना विकल्याचे देखील समोर आले आहेत. ज्यात बाबुसेठ ज्वेलर्स (गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर, धुळदेव ज्वेलर्स (कमळापुर रोड, रांजनगांव), कृष्णा ज्वेलर्स (गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर), ओम ज्वेलर्स (बजाजनगर वाळूज, गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर) यांना विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत. 

यांनी केली कारवाई... 

ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते व सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे, सपोनि. काशीनाथ महांडुळे, पोउपनि प्रविण वाघ, व पोलीस अंमलदार नवनाथ खांडेकर, योगेश नवसारे, विजय भानुसे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, अवलिंग होनराव, राजेंद्र साळुंके, अमोल शिंदे, राहुल खरात, सुनिल बेलकर, महिला अंमलदार दिपाली सोनवणे व गिता ढाकणे, चालक पोउपनि अजहर कुरेशी, ज्ञानेश्वर पवार सर्व नेमणुक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhaji Nagar : गुटख्याच्या हफ्ता म्हणून फोन पे वरुन घेतले 25 हजार, पोलीस अधीक्षकांना कळताच निलंबनाची कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget