Maharashtra Beed News : सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
Maharashtra Beed News : सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकानं आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट आढळली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Maharashtra Beed News : महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटना बीडच्या पालवन चौक परिसरात घडली आहे. राहुल ईश्वर वाघमारे असं मयत शिक्षकाचं नाव असून ते शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. आत्महत्या करण्यापूर्वी ईश्वर वाघमारे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
सुसाईड नोट मध्ये प्राध्यापक बाळासाहेब लाखे आणि त्यांचा सहकारी मुन्ना लोंढे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहचले असून सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत. सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या खळबळजनक घटनेनंतर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
काय लिहिलं आहे सुसाईड नोटमध्ये?
आत्महत्येनंतर राहुल वाघमारे यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये खोटे पुरावे तयार करुन माझ्या घरात कॅमेरे बसविले आहेत. वातावरण कसं आहे? हे पाहून मला कोणकोणत्या प्रकरणात गोवता येईल याचा अभ्यास केला आणि खोटे पुरावे तयार केले. राजकीय, सामाजिक आणि शासकीय माध्यमातून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असं राहुल वाघमारे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. माझ्या मृत्यूमध्ये प्रा. बाळासाहेब लाखेच 101 टक्के दोषी आहे. माझ्या आई-बहिणीची काळजी घ्यावी, ही न्यायदेवतेस प्रार्थना करतो, असंही सुसाईड नोटमध्ये शेवटी नमूद केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :