ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
Bhopal News : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ज्वेलरी शॉपवर काही दिवसांपूर्वी दरोडा पडला होता. या प्रकरणी 13 ऑगस्टला तक्रार दाखल झाली होती.
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काही दिवसांपूर्वी ज्वेलर्स शॉपवर दरोडा पडला होता. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दुकानातील मुद्देमाल लुटण्यात आला होता. या प्रकरणी सेवनिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा ट्रेनी अग्निवीर आहे.
पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश करताना म्हटलं की ज्वेलर्सवर दरोडा अग्निवीर जवानानं टाकला होता. या घटनेत अग्निवीर जवानाला त्याचा भाऊ, बहीण, बहिणीचा नवरा आणि मित्रांनी मदत केली होती. पोलिसांनी या घटनेतील आरोपींच्या अटकेसाठी 50 हजारांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
ज्वेलर्सवर दरोडा पडल्यानंतर मनोज चौहान यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यामध्ये त्यांनी त्यांचं दुकान एसएएस ज्वेलर्सवर 13 ऑगस्टला रात्री पावणे दहाच्या सुमारास एकटा असताना हेल्मेट घातलेल्या दोन लोकांनी प्रवेश केला. एका मुलानं बंदूक काढून धमकावलं, यानंतर पैसे आणि दुकानातील वस्तू दिल्या नाहीत तर मारुन टाकण्याची धमकी दिल्याचं म्हटलं. दुसऱ्या मुलानं चाकूचा धाक दाखवत दुकानात लूट केल्याचं तक्रादारानं म्हटलं. तक्रारकर्ता मनोज चौहान या घटनेत जखमी देखील झाला होता. दुकानात घुसलेल्या दोघांपैकी एकानं सोने आणि चांदी लुटली. त्याशिवाय 30 ते 35 हजार रुपयांची रोख रक्कम देखील पळवली होती.
अखेर आरोपींना अटक
पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी 5 पथकं तयार करण्यात आली होती. पोलीस अधिकारी बागसेवनिया, मिसरोद रासबिहारी शर्मा, रातीबड संतोष रघुवंशी, संजय दुबे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांची पथकं तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या पाच पथकांनी या चोरीबद्दल देशाच्या विविध भागात शोध घेतला. घटनास्थळापासून 20 किलोमीटर आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज शोधण्यात आलं.
पोलिसांनी संशयितांची चौकशी केल्यानंतर ते मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. या दरोड्यातील प्रमुख आरोपी ट्रेनी अग्निवीर असल्याचं समोर आलं आहे. मोहित सिंह बघेल असं त्याचं नाव आहे. मोहित सिंह बघेलसह त्याचा मित्र आकाश रायला देखील अटक करण्यात आली आहे.
मोहित सिंह बघेल, आकाश राय याच्यासह त्याचे सहकारी विकास राय, मोनिका राय, अमित राय आणि गायत्री राय यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्वत: असल्याचं आरोपींनी मान्य केलं आहे. या घटनेपूर्वी गुन्हेगारांनी या ठिकाणाची रेकी केली होती.
मध्य प्रदेश : भोपाल में अग्निवीर जवान ने ज्वेलरी की दुकान में 50 लाख रुपए की लूट की @ABPNews @abplive pic.twitter.com/swqojRGnG8
— Nitinthakur (Abp NEWS) (@Nitinreporter5) August 19, 2024
संबंधित बातम्या :
म्हाडाची फेक वेबसाईट बनवणाऱ्या दोघांना अटक; सायबर पोलिसांनी असा रचला सापळा, डाव फसला