एक्स्प्लोर

धक्कादायक! मोबाईल चार्जर न दिल्याच्या कारणावरून युवतीला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोबाईल चार्जर न दिल्याच्या कारणावरून रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या एका 19 वर्षीय युवतीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीय.

Gadchiroli News : गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यातील आरमोरी तालुका मुख्यालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोबाईल चार्जर न दिल्याच्या कारणावरून रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या एका 19 वर्षीय युवतीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. यात रेस्टॉरंट मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण मारहाणीची घटना कैद झाली असून ही चित्रफीत सध्या समाज मध्यामांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. तर परिसरातून या घटणेचा संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली असून सोहेल शेख (वय 30) आणि  अयुब शेख असे संशयित आरोपीचे नाव असून दोघांविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटणेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मोबाईल चार्जर न दिल्याने मुलीला लथा बुक्क्यांनी मारहाण 

आरमोरी शहरातील वडसा टी पॉईंट येथील एका रेस्टॉरंट मध्ये सोहेल शेख हा आपल्या पत्नीसोबत नाश्ता करण्यासाठी आला होता. कामानिमित्त तो बाहेर निघून गेल्यानंतर त्याच्या पत्नीने रेस्टॉरंटच्या काउंटरवर असलेल्या मुलीला चार्जर मागितला. मात्र तिने देण्यास नकार दिल्याने ही बाब आपल्या पतीला तीने सांगितली. तिथे लगेच पती सोहेल आला आणि त्या मुलीला बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी आपला मित्र अयुब शेख याला ही बोलावलं. तेव्हा त्यांनीही मुलीला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी सोहेल शेख आणि अयुब शेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र, अद्यापही या दोघांना अटक केलेली नसल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकी काय आणि कधी कारवाई करते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. 

लोहारा परिसरात एकाची धारदार शस्त्राने हत्या

श्रावण सोमवार निमित्ताने बेलफुल विकासासाठी आलेल्या एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.  लोहारा परिसरातील कमला पार्क येथे ही घटना घडलीय. रामनाथ सोनटक्के, (रा. घाटंजी रोड कोळंबी) असे मृतकाचे नाव आहे. तर ही हत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान अवधूतवाडी पोलिसांनी याप्रकरण खुणाचा गुन्हा दाखल केलाय.  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनटक्के यांना कुठल्या कारणाने मारले अजून उघड झाले नाही. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कुमार चिंथा आणि पोलीस उपअधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळाला भेट दिली.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषणJitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 04 July 2023Navjot Singh Sidhu Speech Manmohan Singh : नवज्योतसिंग सिद्धूचं गाजलेलं भाषण पुन्हा व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Embed widget