एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Latur Crime : लातुरात सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त गावकऱ्यांचा तीन तास रास्तारोको, आरोपीला फाशी देण्याची मागणी

Latur Crime: लातूर जिल्ह्यातील वलांडीत सहा वर्षाय मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको केला. या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

लातूर : जिल्ह्यातील वलांडी (Latur Walandi Crime News) या गावातील एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. याच गावातील अल्ताफ महेबूब कुरेशी या युवकांने घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर काही दिवसापासून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली. सदरच्या मुलीने आपल्या आईला या अत्याचाराचे माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अत्याचारग्रस्त मुलीच्या वडिलांचं निधन काही वर्षांपूर्वी झाले आहे. 

याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी देवणी पोलिसात भारतीय दंड संहिता, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून कलम 376 ए.बी. 376 (2) 377, 506 अनुसूचित जाती जमाती 1989 नुसार 3 (1) डब्लू (1), 3 (2), 3  बालकांचे लैगिंक अपराध संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम ४ व ६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

गावकऱ्यांचा तीन तास रास्तारोको

शुक्रवारी सकाळी झेंडावंदन झाल्यानंतर वलांडी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या भागातील रस्त्यावर तीन तास रास्ता रोको करण्यात आला. वलांडीतील घटना कळल्यानंतर आजूबाजूच्या गावातील नागरिकही वलांडीत दाखल झाले होते. अचवला, दवणहिप्परगा, बोबळी, टाकळी, धनेगाव, रामवाडी, कवठाळ, कोरेवाडी आदी गावातील नागरिकांचा रस्ता रोकोत सहभाग घेतला होता.

या घटनेची माहिती वलांडी आणि आजूबाजूच्या गावात वाऱ्यासारखी पसरली होती. सदरील घटनेबाबत महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी वलांडी भागातील महिला वर्गांनी एकत्रित येत कॅन्डल मार्च काढला. या घटनेतील दोषी व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

देवाच्या आळंदीत एक महाराजाला बेड्या

वारकरी संप्रदायाला हदरवणारी घटना पुण्यातील देवाची आळंदीत घडली आहे. एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं वारकरी सांप्रदयामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तीन अल्पवयीन मुलांवर नैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप या महाराजावर आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (52 वर्षे) असं या नराधम महाराजाचे नाव आहे. याप्रकरणी पॉस्को कलमाखाली आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम महाराजास बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget