एक्स्प्लोर

Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या

Kolhapur Crime: नवीन वाशी नाका ते फुलेवाडी रिंगरोडवरील 'स्टार लोकल मार्ट'जवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी मोकावरील आरोपी सूरज साखरेवर गोळीबार केला होता.

Kolhapur Crime: कोल्हापूर शहरात भरदिवसा गोळीबार करून दहशत माजवणारे दोन्ही आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून (LCB) अवघ्या 12 तासात जेरबंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवून या दोन आरोपींना जयसिंगपूर येथील अंकली पुलाजवळ सापळा रचून अटक केली. हा गोळीबार 'सुपारी' देऊन करण्यात आल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  

नवीन वाशी नाका परिसरात भरदिवसा थरार

मोकावरील आरोपीवर गोळीबार केल्याची घटना काल (16 जुलै) दुपारी घडली. नवीन वाशी नाका ते फुलेवाडी रिंगरोडवरील 'स्टार लोकल मार्ट'जवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी मोकावरील आरोपी सूरज साखरेवर गोळीबार केला. सूरज साखरे हा स्वतः पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून 'मोका' (MCOCA) सारख्या गंभीर गुन्ह्यातून सध्या जामिनावर बाहेर होता. मारेकऱ्यांनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशानेच गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  

दुचाकीवरून आलेले दोन संशयित निष्पन्न 

भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि शहर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दोन विशेष पथके तैनात केली. जखमी सूरज साखरे याच्या विरोधकांची माहिती गोळा करत असतानाच, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हॉटेल्स आणि लॉजेसची कसून तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे घटनास्थळी मोपेड दुचाकीवरून आलेले दोन संशयित निष्पन्न झाले.  

अंकली पुलावर 'फिल्मी स्टाईल' सापळा

आरोपींचा माग काढत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना अत्यंत महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती मिळाली. गोळीबार करणारे दोन्ही आरोपी विक्रमनगरचा देवा उर्फ रफिक मुल्ला आणि मणेरमळ्याचा शाहबाज मुल्ला हे असून, गुन्ह्यानंतर ते कर्नाटकात पळून गेले होते. ते आज (17 जुलै) जयसिंगपूर येथील अंकली पुलावरून कोल्हापुरात परतणार असल्याची टिप पोलिसांना मिळाली.  माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव पाटील, संतोष बरगे आणि गजानन गुरव यांच्या पथकाने अंकली पुलाजवळ फिल्डिंग लावली. पुलाजवळ संशयास्पदरित्या फिरत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या संशयितांनी पोलिसी खाक्या दाखवताच, सूरजला ठार मारण्याच्या उद्देशानेच गोळीबार केल्याची कबुली दिली.  

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget