Ambernath : सख्ख्या भावांचं अपहरण, अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ambernath : सख्ख्या भावांचं अपहरण झाल्याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.
Ambernath : अंबरनाथ शहरात दोन सख्ख्या भावांचं अपहरण (Kidnapping) झाल्याची घटना समोर आली आहे. अपहरण झालेले हे दोघे भाऊ अल्पवयीन आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात ( Ambernath police station) अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून अंबरनाथ पोलिसांकडून मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
पश्चिमेच्या भेंडीपाडा भागात राहणारे आठ वर्षीय रमजान आणि 11 वर्षीय सिराज अली या दोघांचे अपहरण झाले आहे. याबाबत त्यांच्या पालकांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एक महिन्या पूर्वी रमजान आणि सिराज हे भाऊ घरातून निघून गेले. या दोघांना पंक्चर काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोल्युशनची नशा जडली होती. शिवाय या आधी देखील दोघे घर सोडून गेले होते. मात्र, आता त्यांच्या आईच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुंबई, उपनगर आणि आजूबाजुच्या परिसरात पोलिसांकडून या भावांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांनी दिली आहे.
दरम्यान, हे दोघे भाऊ घरातून निघून गेले आहेत की, त्यांचं अपहरण झालं आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आपल्या मुलांचा लवकरात-लवकर शोध घेण्यात यावा अशी मागणी तक्रार दाखल करणाऱ्या या मुलांच्या आईने पोलिसांकडे केली आहे. या मुलांच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Free Laptop: केंद्र सरकारची मोफत लॅपटॉप योजना, तुम्हालाही आला आहे हा मेसेज? जाणून घ्या सत्य
- धक्कादायक! गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, स्पोर्ट्स कोचकडून विद्यार्थिनीवर अत्याचार
- Akola Crime News : धक्कादायक! जावयाने सासऱ्याची धारदार शस्त्राने केली हत्या
- आधी पीएवर हल्ला आता मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ