एक्स्प्लोर

Navi Mumbai Crime: उरण हत्याकांडप्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले, 'त्या' एका नंबरवरील व्यक्तीशी सतत बोलायची यशश्री शिंदे

Uran Yashshree Shinde Case: उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे.

Navi Mumbai Crime: नवी मुंबई : यशश्री शिंदेची (Yashashri Shinde) निर्दयीपणे हत्या (Uran Murder Cae) करण्यात आली, या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. तिच्यावर निघृणपणे करण्यात आलेले वार म्हणजे, माणुसकीवरच वार असल्याचं बोललं जात आहे. देशभरात या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्रं हातात घेतली असून वेगानं तपास सुरू आहे. अशातच उरण हत्याकांड प्रकरणी नवा खुलासा करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कर्नाटकातून मोहसिन नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मोहसिन फोनवर सातत्यानं यशश्रीच्या संपर्कात असल्याचे पोलिसांकडे पुरावे असल्याची माहिती मिळत आहे. 

उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोहसिन नावाच्या तरुणाला कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे. मोहसिनला पुढील चौकशीकरता महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हलवली. त्यावेळी यशश्रीच्या कॉल रेकॉर्ड्सवरुन एका नंबरवर तिचं सातत्यानं बोलणं होत असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी तपासाची दिशा त्यानुसार वळवली आणि तो नंबर ज्याच्या नावावर होता, त्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या हाती यश आलं असून पोलिसांनी तो नंबर ज्या व्यक्तीचा होता, त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

यशश्रीवर वार, चेहरा बिघडवण्याचाही प्रयत्न, नेमकं घडलं काय? 

नवी मुंबईतील घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची (Uran Murder Cae) माहिती समोर आली. यशश्रीच्या मारेकऱ्यानं निर्दयीपणे तिच्यावर वार केले, तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला. 

यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एका दाऊद शेख नामक व्यक्तीचा उल्लेख केला. त्याच्याकडून मृत्यूपूर्वी यशश्रीवर बलात्कार करण्यात आला होता का? याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. या घटनेनंतर दाऊद शेख या आरोपीला पकडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण केला आहे. दाऊद शेख यानं यशश्री शिंदे 15 वर्षांची असतानाही तिच्यावर अत्याचार केले होते. दाऊद शेख हा एक ट्रक ड्रायव्हर आहे. त्याने 2018 साली पहिल्यांदा यशश्री शिंदे हिला पाहिले. त्यावेळी यशश्री 15 वर्षांची होती. दाऊद शेखनं त्यावेळी यशश्रीला आपल्या जाळ्यात ओढले आणि 2019 साली त्यानं तिच्यावर अत्याचार केले होते. त्यावेळी यशश्री शिंदे हिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार दाऊद शेख याच्यावर पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याची तुरुंगातून रवानगी करण्यात आली होती. अलीकडेच तो तुरुंगातून सुटला होता. यानंतर त्यानं पुन्हा यशश्रीचा पाठलाग करायला सुरुवात केली. दाऊद शेख सतत यशश्रीला फोन करायचा. अखेर 25 जुलैला ती घराबाहेर पडल्यानंतर दाऊद शेखनं तिला गाठून तिची हत्या केल्याचा संशय आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली. सायंकाळी साधारण साडेचारनंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर यशश्री कोणालाच दिसली नाही. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

दाऊद शेख सीसीटीव्हीत कैद   

नवी मुंबईतील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखचा पोलीस शोध घेत आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आरोपी दाऊद शेख एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन फोटो समोर आले आहेत. पहिल्या फोटोमध्ये 25 जुलैच्या दुपारी 2 वाजून 14 मिनिट 35 सेकंदांनी यशश्री एक काळ्या रंगाची छत्री घेऊन जात आहे. दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, आरोपी दाऊद शेख 10 मिनिटांनी म्हणजेच, 2 वाजून 22 मिनिटांनी यशश्रीच्या मागे जात आहे. त्याच दिवशी यशश्रीची हत्या करण्यात आली. तेव्हापासूनच आरोपी दाऊद शेख फरार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Navi Mumbai Crime: तुरुंगातून बाहेर येऊन दाऊदने यशश्री शिंदेवर सूड उगवला, कुटुंबाचा आरोप, उरण हत्याकांडाची ए टू झेड कहाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget