महिलेला कपडे काढायला सांगून वॉर्डबॉयने ड्रेसिंग केलं, व्हिडीओ बनवला अन्...; खासगी रुग्णालयातील संतापजनक घटना
Uttar Pradesh Crime News: व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Uttar Pradesh Crime News उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमधील बस्ती शहरातील एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका रुग्णालयात वॉर्डबॉयचा एका महिला रुग्णासोबत केलेल्या अश्लील कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
बस्ती शहरातील एका खासगी रुग्णालयात (Uttar Pradesh Crime News) वॉर्डबॉयने ड्रेसिंग करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या महिलेचे कपडे काढण्यास सांगितले. त्याने महिला कपडे काढताना आणि ड्रेसिंग करताना आणि कपडे घालतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. विक्की असे या वॉर्डबॉयचे नाव आहे. बस्ती शहरातील ही घटना आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनीही चौकशी सुरू केली आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नेमकं काय घडलं?
सदर संपूर्ण प्रकरण बस्ती शहरातील खासगी रुग्णालय बस्ती केअर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे असून, तेथे असे विचित्र प्रकार उघडकीस आले आहेत. विकी असे या रुग्णालयात तैनात असलेल्या वॉर्डबॉयने उपचाराच्या नावाखाली महिलेला विवस्त्र करुन तिचा व्हिडीओही व्हायरल केला. रुग्ण महिलेचे कपडे उतरवतानाचा व्हिडीओ वॉर्डबॉयनं चित्रित केला. त्यानंतर तो व्हॉट्स ऍप स्टेटसला ठेवला. त्याचा स्टेटस अनेकांनी पाहिल्यानं या घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर आरोग्य खात्यावर चौफेर टीका झाली. त्यामुळे विभागाला खडबडून जाग आली. वॉर्ड बॉय डॉक्टरांना सर्जरी करताना मदत करत होता. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला ऑपरेशन थिएटरमध्ये झोपलेली दिसत आहे. या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण वॉर्ड बॉयनं केलं. त्यानंतर व्हिडीओ व्हॉट्स ऍप स्टेटसला ठेवला. या घटनेबाबत रुग्णालयाच्या संचालकांना विचारले असता, सदर वॉर्डबॉयला रुग्णालयातून हकालपट्टी केल्याची माहिती दिली.
डीएमने दिले कारवाईचे आदेश-
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासगी रुग्णालयात एकच खळबळ उडाली. जिल्हा अधिकारी रविश गुप्ता यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.सीएमओ आरएस दुबे यांनी सांगितले की, त्यांना मीडियाकडून ही माहिती मिळाली असून ते तातडीने एक पथक घटनास्थळी पाठवून याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करतील.
संबंधित बातमी:
मुंबईच्या एसी लोकलमध्ये टीसीला धू धू धुतलं, शर्ट फाडला, बुक्के मारले; 3 तरुणांचं पुढे काय झालं?