एक्स्प्लोर

मुंबईच्या एसी लोकलमध्ये टीसीला धू धू धुतलं, शर्ट फाडला, बुक्के मारले; 3 तरुणांचं पुढे काय झालं?

Mumbai Local TC Clashes: मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग हे तिकीट तपासत असताना त्यांना एसी लोकल ट्रेनमध्ये तीन प्रवासी प्रथम श्रेणीचे तिकीट घेऊन प्रवास करत असल्याचे आढळून आले.

मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग हे तिकीट तपासत असताना त्यांना एसी लोकल ट्रेनमध्ये तीन प्रवासी प्रथम श्रेणीचे तिकीट घेऊन प्रवास करत असल्याचे आढळून आले. जसबीर सिंग यांनी प्रवाशांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर दुसरा प्रवासी अनिकेत भोसले याने जसबीर सिंग यांच्याशी वाद घातला कालांतराने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ज्यावेळी लोकल बोरिवली स्थानकावर पोहोचली तेव्हा सिंग यांनी भोसले यांना लोकलमधून उतरण्यास सांगितले पण भोसले यांनी नकार दिला.जसबीर सिंग यांना झालेल्या मारहाणीत ते जखमी झाले असून प्रवाशाने त्यांचा शर्ट फाडल्याचेही व्हिडीओमधून समोर आले होते. 

पुढे काय झालं?

सदर हाणामारीत जसबीर सिंग यांनी इतर प्रवाशांकडून दंडात्मक स्वरुपात जमा केलेली रक्कम 1500 रुपयेही गहाळ झाल्याचे समोर आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ एसी लोकलमध्ये असलेल्या एका प्रवाशाने बनवला. जसबीर सिंग आणि 3 विनातिकीट प्रवाशांची हाणामारी सुरु होती. यानंतर आरपीएफचे काही अधिकारी लोकमध्ये दाखल झाले आणि प्रवासी अनिकेत भोसले याला नालासोपारा येथे लोकलमधून उतरवण्यात आले. या घटनेनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर 3 तरुण वटणीवर आले आणि त्यांनी आपली चूक मान्य केली. या घटनेत दसबीर सिंग यांचे गहाळ झालेले 1500 रुपये देखील जसबीर सिंग यांना परत केले आणि लेखी माफीनामा सादर केला. एफआयआर नोंदवला गेला तर त्याच्या नोकरीवर परिणाम होईल या हेतून जसबीर सिंग यांनीच मोठं मन दाखवत प्रवाशांवर गुन्हा न दाखल करत सक्त तकीद देऊन सोडले.

नेमकी घटना काय?

चर्चगेट-विरार जलद एसी लोकल ट्रेनमध्ये गुरुवारी एका प्रवाशाच्या बेशिस्त वर्तनामुळे गोंधळ उडाला होता. या वादाचे रूपांतर रेल्वे टीटीसोबत हाणामारीत झाले. चर्चगेट ते विरार एसी लोकल ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढलेल्या तीन प्रवाशांनी मुख्य तिकीट निरीक्षकाला मारहाण केली. या घटनेदरम्यान, जसबीर सिंग हे किरकोळ जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ डब्यातील तीन प्रवाशांनी रेकॉर्ड केला होता. जसबीर सिंग यांनी या प्रवाशांना त्यांची तिकिटे दाखवण्यास सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिकीट चुकीचे असल्याचे समजल्यानंतर टीसीने त्यांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर अनिकेत भोसले नावाच्या प्रवाशाने सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकाऱ्याने त्यांना पुढील बोरिवली स्थानकावर ट्रेनमधून उतरण्यास सांगितले. मात्र भोसले यांनी नकार दिला वाद घातला आणि या वादाने रुपांतर हाणामारीत झाले.

संबंधित व्हिडीओ-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Embed widget