दादर स्टेशनवर सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहप्रकरणी बेल्जियममध्ये राहणाऱ्या व्यक्तीविरोधात लुकआउट नोटीस; सर्वात मोठा गुंता सुटला
Dadar Suitcase Dead Body: जगपालप्रीत सिंग हे पंजाबमधील फगवाडा येथील असून सध्या बेल्जियममध्ये राहतात.
मुंबईतील दादर स्टेशनवर लाल सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांनी बेल्जियममध्ये राहणाऱ्या व्यक्ती विरोधात लुकआउट सर्कुलर (एलओसी) जारी करत आहे. बेल्जियमचा रहिवासी जगपालप्रीत सिंग नावाचा व्यक्ती पीडितेची हत्या करताना हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना सूचना देत असल्याचे तपासात समोर आले आहे.
कुर्ल्यातील मूकबधिर अर्शद अली सादिक अली शेख याची हत्या करण्यात आली. मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या दादर रेल्वे स्थानकावर एका सूटकेसमध्ये (Dadar Suitcase Dead Body) त्याचा मृतदेह कोंबून भरला होता. याप्रकरणाचा गुंता आता जवळपास सुटल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान मुंबई पोलिसांनी बेल्जियममध्ये राहणाऱ्या जगपालप्रीत सिंग नावाच्या व्यक्तीला लुकआउट सर्कुलर जारी केले आहे.
मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी शुक्रवारी माझगाव मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाला माहिती दिली की, त्यांनी जगपालप्रीत नावाच्या अनिवासी भारतीयाविरुद्ध लुकआउट सर्कुलर (एलओसी) आणि ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जगपालप्रीत सिंग हे पंजाबमधील फगवाडा येथील असून सध्या बेल्जियममध्ये राहतात. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जय चावडा आणि तिसरा आरोपी शिवजित सिंग, पीडित पत्नी रुक्साना अर्शद अली शेख यांना अटक केली असून, तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पीडितेला विवस्त्र करून बेदम मारहाण-
पोलिस तपासात असे आढळून आले की, खून करणाऱ्या आरोपीने पीडितेला विवस्त्र करून बेदम मारहाण केली होती आणि हे करताना त्याचा व्हिडीओही बनवला होता. यावेळी त्यांनी अनेकदा बेल्जियममध्ये राहणाऱ्या सिंग यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला.
नेमकं प्रकरण काय?
2012 मध्ये अर्शदचा रुक्सानासोबत प्रेमविवाह झाला. अर्शद आणि रुक्सानाला दोन मुलं आहेत. अर्शद छोटी-मोठी कामं करुन कुटुंबीयांचा उदर्निवाह करायचा. पायधुनीमधील गुलालवाडी परिसरात कोट्यवधींच्या घरात राहणारा जय चावडा आणि शिवजीत सिंह यांच्यासोबत क्रिकेट खेळायला जायचा. कालांतराना तिघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर जय चावडाच्या फ्लॅटमध्ये दारू पार्ट्या सुरू झाल्या. जय चावडा मुंबईतील अंधेरी भागात एका लॅबमध्ये अॅनिमेशनचं काम करायचा. त्याच्या घरात तो एकटाच राहायचा. त्याची आई आणि भाऊ कॅनडात वास्तव्याला होते. जयच्या घरात कुणीच नसल्यामुळे अर्शद आणि शिवजीत त्याच्याकडेच असायचे. पुढे दर रविवारी तिघेही घरात एकत्र दारू पार्ट्या करायचे. रविवारी नेहमीप्रमाणे तिघेही जयच्या घरी जमले होते. नेहमीप्रमाणे त्यांची दारू पार्टी सुरू होती. त्याच वेळी जय आणि शिवजीतनं अर्शदचा काटा काढायचं ठरवलं. दोघांनीही त्याच्या हत्येचा कट आखला आणि तो तडीस नेला. ठरल्याप्रमाणे प्लॅन यशस्वी झालाही. पण, पोलिसांनी अखेर याप्रकरणाचा छडा लावला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.