Gutka Smuggling: धुळ्यात तब्बल 19 लाख रुपयांचा गुटखा जप्त, पिंपळनेर पोलिसांची मोठी कारवाई
Gutka Smuggling: धुळे (Dhule) जिह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.
Gutka Smuggling: धुळे (Dhule) जिह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पिंपळनेर पोलिसांनी गुटख्याची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिकअप आणि ईनोवा कार जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 39 लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर साक्री मार्गे अवैधरीत्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सामोडे चौफुली येथे सापळा रचून पिकअप वाहनाची तपासणी केली. या गाडीची तपासणी केली असता यात पोलिसांना 10 लाख 74 हजार 60 रुपये किमतीचा विमल पान मसाला, तसेच 6 लाख 2 हजार 100 रुपये किमतीच्या पंधरा पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये भरलेला विमल पान मसाला सापडला. यातच 1 लाख 89 हजार 540 रुपये किमतीची तंबाखू, 75 हजार रुपये किंमतीच्या तंबाखूची 108 पाकिटेही पोलिसांना सापडली. या कारवाईत पोलिसांनी 19 लाख 40 हजार 700 रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. तर 8 लाख रुपये किंमतीचे पीकअप वाहन आणि 12 लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार असा एकूण 39 लाख 40 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत जुबेर अंसारी, वसीम अंसारी, सोनू विधाते आणि प्रियाकीर्ती राजू पगारे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे. यांचा आणखीन एक साथी यातील सचिन जीवन मुर्दाडकर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या