एक्स्प्लोर

Gondia News : प्रॉपर्टी डीलरवर अज्ञात मारेकऱ्यांचा प्राणघातक हल्ला; दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने गोंदिया हादरला

गोंदिया शहरातील एका प्रॉपर्टी डीलरवर काही अज्ञात मारेकर्‍यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गोंदिया शहर या हत्येच्या घटनेने हादरले आहे.

Gondia News गोंदियागोंदिया शहरातील एका प्रॉपर्टी डीलरवर काही अज्ञात मारेकर्‍यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गोंदिया शहर या हत्येच्या घटनेने हादरला आहे. गोंदिया शहरातील प्रॉपर्टी डीलर महेश दखने (वय 35 वर्ष) यांच्यावर हा हल्ला झाला आहे. यात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवत  महेश दखने यांना गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. घटना गोंदिया शहरातील (Gondia News) किसान चौक छोटा गोंदिया येथे घडली आहे. गोंदिया शहरातील महेश दखने हे आपल्या टू-व्हीलर गाडीने जात असतांना अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत डोक्यावर हातोडा, कुऱ्हाडी, तलवार आदी हत्याराने वार केले. त्यामुळे क्षणात महेश दखणे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले. घटनास्थळावरून आरडाओरडा ऐकून काही लोक धावले, मात्र तोपर्यंत  हल्लेखोर पळून गेले. 

दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने गोंदिया हादरला

त्यानंतर स्थानिक नागरिकांनी गंभीर जखमी महेश दखणे यांना बेशुद्ध अवस्थेत डॉ. बहेकर यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बराच वेळ पडून राहिल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने महेश दखणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची महिती आहे. घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी 

गोंदिया शहरातील किसान चौक (छोटा गोंदिया) येथे जान्हवी ऑटो रिपेअरिंग सेंटर जवळ सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास शहरातील  प्रॉपर्टी डीलर महेश दखने यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र वर्दळीच्या रस्त्यावर अचानक झालेला आरडाओरडा ऐकून काही लोक मारेकऱ्यांच्या मागे धावले,  मात्र हल्लेखोर तोपर्यंत पळून गेले होते. दरम्यान बघ्यांची एकच गर्दी जमली पण त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्याची तसदी कोणी घेतली नाही, दरम्यान वाचन खंदारे नामक एका व्यक्तीने फोन करून या प्रकरणाची माहिती माजी नगरसेवक लोकेश कल्लू यादव यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून गंभीर जखमी महेश दखणे यांना बेशुद्ध अवस्थेत डॉ. बहेकर यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनास्थळी उपस्थित असलेले शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी माहिती देताना सांगितले की, महेश दखणे हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याने हा हल्ला झाला असावा असा अंदाज आहे. मालमत्तेचा वाद किंवा जुन्या वैमनस्यामुळे ही घटना घडली याचा तपास सध्या पोलीस घेत आहे. तसेच मारेकऱ्यांचा तपास देखील घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Embed widget