एक्स्प्लोर

Gondia News : उधारीच्या पैशांचा वाद विकोपाला, मालकाने चालकाचा खून करून मृतदेह खड्डयात पुरला, मात्र....

Gondia News : उधार नेलेले 80 हजार रुपये परत करत नाही आणि वर कामावरही येत नाही, म्हणून मालकानेच पत्नी, मुलगा आणि अन्य साथीदारांच्या मदतीने चक्क आपल्या वाहनचालकाची हत्या केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

Gondia News गोंदियागोंदिया शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उधार नेलेले 80 हजार रुपये परत करत नाही आणि वर कामावरही येत नाही, म्हणून मालकानेच पत्नी, मुलगा आणि अन्य साथीदारांच्या मदतीने चक्क आपल्या वाहनचालकाचा खून केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह शहरातील गौतमनगर स्मशानभूमीला लागून असलेल्या झुडपी जंगलात देखील पुरला आहे. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा गोंदिया शहर पोलिसांनी कोणतेही पुरावे नसताना सिनेस्टाईल तपास करून 4 दिवसानंतर या घटनेचा उलगडा केला आहे. शांतनू अरविंद पशिने (वय ३६, रा. मोहगाव, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. 

4 दिवसानंतर घटनेचा उलगडा 

मिळालेल्या माहितीनुसार, 6 ते 7 जणांनी एका युवकाचा खून करून मृतदेह जंगलात पुरला, अशी चर्चा 30 सप्टेंबर रोजी गौतमनगर येथील पानटपरीवर सुरू होती. ही चर्चा पोलिसांच्या एका खबऱ्याने ऐकताच त्याने ही माहिती गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम थेर यांच्यामार्फत ठाणेदार किशोर पर्वते यांना दिली. यावर ठाणेदार पर्वते यांनी पोलीस ताफ्यासह गुप्तरित्या पूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्या परिसरात कोणीही बेपत्ता असल्याची तक्रार किंवा तशी माहिती मिळून आली नाही. दरम्यान, पानटपरीवर ज्या भागात ही चर्चा होती, त्या भागाची पोलिसांनी पाहणी केली. हा भाग झुडपी जंगल असल्याने आणि जंगली जनावरे असल्याने मृतदेह पुरल्याच्या ठिकाणचा शोध घेणे शक्य होत नव्हते. तथापि, 2 ऑक्टोबर रोजी  ठाणेदार पर्वते यांनी सहकारी पोलिसांसह मध्यरात्री गौतमनगर येथील स्मशानभूमीलगतचा झुडपी जंगल पिंजून काढले. या ठिकाणी एक मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत असल्याचे समजले. 

पुरावे नसताना पोलिसांचा सिनेस्टाईल तपास

त्यानंतर हा मृतदेह खड्ड्याबाहेर काढला. मृताचा फोटो परीसरातील लोकांना दाखविला असता त्यातील काही जणांनी सदर मृतदेह शांतनू पशिने याचा असल्याचे आणि तो विक्रम बैस (रा. गौतमनगर) याच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून असल्याचे ओळखले. यावरून पोलिसांनी विक्रम बैस याच्याबाबत चौकशी केली असता तो आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून फरार असल्याचे आढळून आले. तसेच विक्रम बैससोबत राहणारे अन्य तीन ते चारजणसुद्धा फरार असल्याचे चौकशीत दिसून आले. या प्रकरणी ठाणेदार किशोर पर्वते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गेडाम करीत आहेत.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget