(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : शहरात चेन स्नॅचिंग करणारी तरुणींची टोळी सक्रिय, म्होरक्याचा पोलिसांकडून शोध
नागपुरातील तरुणीने सकाळी सक्करदरा येथे एका महिलेची पर्स चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत महिलेने कुठलीही तक्रार न केल्याने तिला सोडून देण्यात आले होते.
नागपूरः काही दिवसांपूर्वी शहरातील धंतोली परिसरात चेन स्नॅचिंगच्या (chain snatching) प्रयत्नात असलेल्या दोघी तरुणी पोलिसांच्या हाती लागल्यावर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. शहरातील एका कुख्यात गुंडाच्या छत्रछायेत तरुणींकडून विविध गुन्हे घडवून आणण्यात येत आहेत. पोलिसांकडून (Nagpur Police) या म्होरक्याचा शोध घेण्यात येत असून लवकरच त्याला अटक होणार असल्याची माहिती आहे.
सकाळीही केला होता चोरीचा प्रयत्न
चेनस्नॅचिंगच्या घटनेत धंतोली पोलिसांच्या हाती लागलेली त्रिशा खान हिने गँगमध्ये सहभागी झाल्यावर शुक्रवारी सकाळी सक्करदरा (Sakkardara) येथे त्रिशाने एका महिलेची पर्स चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिला पकडण्यात आले. मात्र, याबाबत महिलेने कुठलीही तक्रार न केल्याने तिला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर तिने सायंकाळी चेनस्नॅचिंगचा प्रयत्न केला.
चोरीचे साहित्य विकरणारा कोण?
शहरातील चेनस्नॅचिंगसाठी तरुणी हेरुन त्यांच्या माध्यमातून महिलांच्या पर्स चोरणे (Steal a purse), महिलांना लुटणे आणि मंगळसूत्र हिसकवण्याचे प्रकार घडवले जात होते. हे चोरीचे साहित्य, दागिने आणि इतर वस्तूंचीही विल्हेवाट लावण्याचे काम वसीमच्या माध्यमातून होते. त्यासाठी त्याचा साथीदार आशूही त्याला मदत करत असल्याची माहिती आहे.
अल्पवयीन मुलगी सुधारगृहात
चेनस्नॅचिंगच्या घटनेमध्ये सापडलेली अल्पवयीन मुलगी (A minor girl) कुख्यात आहे. तिच्यावर विविध पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहे. मात्र, नियमानुसार तिला जास्तवेळ कोठडीत ठेवता येत नसल्याने पोलिसांनी तिची रवानगी अमरावती येथील बालसुधारगृहात केली आहे.
गँगमध्ये आणखी सदस्य?
दोघी तरुणींना अटक केल्यानंतर शहरात पाच ते सात तरुणींची एक टोळी सक्रिय (Girls Gang Active) असून अशा घटना घडवत असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, हे करत असताना गुन्ह्यातून चोरलेले सोने आणि वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी या टोळीत आणखी काही जण असल्याचा संशयावरुन पोलिसांनी खोल तपास केला. तपासानंतर त्यांना शहरातील एक कुख्यात गुंड या चोरीच्या वस्तूंची विक्री करुन समसमान वाटणी करत असल्याची माहिती मिळाली आहे. वसीम असे या कुख्यात गुन्हेगाराचे नाव असून तो या गँगला ऑपरेट करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचा शोध धंतोली पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान त्रिशा खान हिला विशेष सत्र न्यायालयात सादर केले असता तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या