(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : नागपूरवरुन मध्य रेल्वेच्या 4 नव्या 'फेस्टिव्हल स्पेशल' गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक
Nagpur News : सणांमध्ये रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने अनेकांची तिकीटे कनफर्म होत नाही. नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुंबई ते नागपूर विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.
Nagpur News : नवरात्रोत्सवापासून सणासुदीला सुरुवात होते. आगामी दिवाळी, छट पूजन अशा विविध सणांमध्ये रेल्वेत होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर-मुंबई मार्गावर चार 'फेस्टिव्हल स्पेशल' गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरु झाली असून नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन तिकीट काउंटरवरुन बुकिंग करता येईल.
मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट (Mumbai Nagpur Special) विशेषः 01033 विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 22 आणि 29 ऑक्टोबर 2022 रोजी 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.32 वाजता नागपूरला पोहोचेल. नागपूर-मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट विशेषत: तसेच 01034 विशेष ट्रेन 23 आणि 30 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूरवरुन (Nagpur) 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाड्या खालील स्टेशनवर थांबतील
दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या थांब्यांवर थांबणार आहे. या गाड्यांची रचना दोन डबे AC-2 टियर, 8 डबे AC-3 टियर, 4 डबे स्लीपर क्लास, 5 डबे सामान्य द्वितीय श्रेणी प्रमाणे राहील. ज्यामध्ये गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन आहे.
'फेस्टिव्हल स्पेशल'साठी आरक्षण सुरु
विशेष ट्रेन क्रमांक 01025, 01027, 01033/01034, 01031, 02105 आणि 01043 ची बुकिंग रविवारी, 25 सप्टेंबर 2022 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर सुरु झाली आहे. वरील विशेष गाड्यांच्या विस्तृत थांबा आणि वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES या अॅपद्वारेही करता येईल.
'वन स्टेशन, वन प्रोडक्ट' योजना ऑक्टोबरमध्ये सुरू होणार
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील (Nagpur Railway Division) दहा स्थानकांवर आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. त्याची रचना अहमदाबादमध्ये (Ahmedabad, Gujarat) तयार करण्यात आली असून ही रचना पाहण्यासाठी नागपुरातील रेल्वे अधिकाऱ्यांना (Officers from Nagpur Railway Division) अहमदाबादला पाठवण्यात आले आहे. विदर्भातील समृद्ध परंपरागत वारसा (Vidarbha Culture) रेल्वे स्थानकांवर दिसणार आहे. वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेकडून वेगाने काम केलं जात आहे. स्टॉल्समध्ये एकसमानता राखण्यासाठी सर्व स्थानकांवर एकासारखेच डिझाईनचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Garba: 'गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला प्रवेश द्या'; विश्व हिंदू परिषदेची मागणी