एक्स्प्लोर

भारतात फिरण्यासाठी आलेल्या अमेरिकन तरुणीनं रचली अपहरणाची खोटी कहाणी, पोलिसांनी 24 तासांत सोडवलं प्रकरण, नक्की काय घडलं?

Fraud Kidnapping Case : नवी दिल्ली पोलीस उपायुक्त अमृता गुगुलोथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोले रेनी नावाची अमेरिकन तरुणी 03 मे रोजी नवी दिल्लीतील विमानतळावर उतरली.

US Women Kidnaped : भारतात पर्यटनसाठी आलेल्या अमेरिकन तरुणीच्याअपहरणाची माहिती मिळताच खळबळ  माजली, यानंतर दिल्ली पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली. दिल्ली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शर्थीचे प्रयत्न करत तरुणीचा शोध लावला. पण जेव्हा तरुणी सापडली तेव्हा खरी हकीकत समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. या तरुणीचं अपहरण झालंच नव्हतं, तर तिने तिच्या नायजेरियन मित्रासोबत मिळून ही सर्व खोटी कहाणी रचली होती.

अमेरिकन तरुणीनं रचली अपहरणाची खोटी कहाणी
नवी दिल्ली पोलीस उपायुक्त अमृता गुगुलोथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोले रेनी नावाची अमेरिकन तरुणी 03 मे रोजी नवी दिल्लीतील विमानतळावर उतरली. त्यानंतर दोन महिने ती पर्यटन करत देशभर फिरली. पण 09 जुलै रोजी कोल रेनीने अमेरिकन सिटिझन सर्व्हिसला ईमेल करत मदत मागितले आणि सांगतले की भारतात तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात आहे. या ईमेलमध्ये अधिक माहिती नव्हती.

यादरम्यान, कोलने 10 जुलै रोजी अमेरिकेत राहणाऱ्या पालकांशी व्हॉट्सअॅप कॉलवर संपर्क साधला. तिने व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलमध्ये आईला तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा दाखवल्या. तिने आईला सांगितले की काही लोकांनी तिला मारहाणही केली. मात्र, तिला कुठे ठेवले होते, हे सांगितले नाही. कॉल सुरू असताना काही लोक मुलीच्या खोलीत आले, त्यानंतर कोले यांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर तिचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही. चार-पाच दिवस उलटून गेल्यावर मुलीच्या आईने अमेरिकन सिटिझन सर्व्हिसशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्याची माहिती नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाला देण्यात आली. अमेरिकन दूतावासाने अमेरिकन तरुणीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात दिली. ज्यानंतर अपहरणाच्या कलमाखाली एफआयआर नोंदवून तरुणीचा शोध सुरू झाला.

असा लागला अमेरिकन तरुणीचा शोध
पोलीस उपायुक्त अमृता गुगुलोथ यांनी सांगितलं की, चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक पथकं तयार करण्यात आली आणि तरुणीचा शोध सुरू झाला. आधी पोलिसांनी Yahoo.com वरून ईमेल सिस्टमचा IP अॅड्रेस शोधला. तसेच कोलेने तिच्या आईला ज्या मोबाईलवरून फोन केला होता तो मोबाईल ट्रेस करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याशिवाय, कोलेने भारतात आल्यावर भरलेल्या इमिग्रेशन फॉर्ममधून माहिती गोळा करण्यात आली. इमिग्रेशन फॉर्ममध्ये तिने ग्रेटर नोएडा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची माहिती दिली होती, पण जेव्हा टीमने हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा ती तिथे पोहोचली नसल्याचं समजलं. पोलिसांनी बाबींचा शोध घेतल्यानंतर कोलेच्या मित्राचा नंबर सापडला. त्याआधारे पोलिसांनी गुरुग्राम गाठले. तेथून नायजेरियन नागरिक रिचीसोबत विचारपूस करण्यात आली. रिचीने दिलेल्या पत्त्यावर कोले सापडली.

'या' कारणासाठी रचली खोटी कहाणी
पोलिसांनी कोले सापडल्यानंतर त्यांनी तिला विचारणा केली असता, कोलेने अपहरणाची खोटी कहाणी रचण्यामागचं कारण सांगितलं. कोलेने आईवडिलांना भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी अपहरणाची खोटी कहाणी रचली.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget