एक्स्प्लोर

Fake Medicines : बनावट औषधं निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपनीचा भांडाफोड, वसईत FDAची मोठी कारवाई

FDA Action Against Vasai Medicine Company : वसईहून औषध उत्पादन करुन, बिलावर जालंधर येथील पत्त्याचा ते उल्लेख करुन या बनावट औषधांची विक्री सुरू असल्याचं या कारवाईतून उघड झालं.

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीच्या गौरखधंद्याचा भांडाफोड केला आहे. दिनांक 10 जुलै रोजी वसईच्या गहरवार फार्मा प्रोडक्टस प्रा.लि. कंपनीवर धाड टाकून 1 कोटी 41 लाखांची औषधे आणि त्याला लागणाऱ्या मशिनरी, कच्चा माल, पॅकिंग मटेरियल, लेबल्स इत्यादी वस्तू जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे असून परवाना रद्द झाला असताना ही कंपनी औषधे उत्पादन करुन वितरीत करत असल्याचं समोर आलं आहे. 

वसईच्या गहरवार फार्मा प्रोडक्टस प्रा.लि. या कंपनीने हरयाणा येथील आयुर्वेदिक  औषध उत्पादनाकरता नियमाप्रमाणे परवाना घेतला होता. मात्र हा परवाना 14 मे 2024 रोजी रद्द झाला होता. रद्द झाला तरी याच परवान्याचा वापर करुन वसई येथे अवैद्यरित्या ते औषधे बनवत होते. 

या परवाना अंतर्गत ते जालंधर येथील ओंकार फार्मा यांना औषधे विक्री आणि वितरण करत असल्याच दाखवत होते. परंतु ही कंपनी वसई येथे होती. वसईहून औषध उत्पादन करुन, बिलावर जालंधर येथील पत्त्याचा ते उल्लेख करुन औषध विक्री करत होते. 

ओंकार फार्मा यांच्या वसई येथे धाडीत काही औषधे असे आढळून आले की ज्यांच्या औषधाच्या लेबलवर गहरवार फार्मा वसई, पालघर म्हणून नाव नमूद होतं आणि त्याची उत्पादने दिनांक जानेवारी2024 अशी नमूद केली होती. या ठिकाणी ऋषभ मेडिसिन यांचा आयुर्वेदिक औषध उत्पादन करता परवाना होता. मात्र तो परवाना  2022 रोजीच रद्द झाला होता.
 
याच कंपनीविरुद्ध मार्च 2024 मध्ये नवघर वसई येथे विना परवाना आयुर्वेदिक औषध उत्पादन केल्याप्रकरणी तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये अॅलोपॅथी औषध मिश्रण केल्याप्रकरणी औषध जप्तीची  कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याची भागिदारी संस्था ऋषभ मेडिसीन नवघर वसई यांच्या विरुद्ध 2021 मध्ये आयुर्वेदिक औषदामध्ये अॅलोपॅथी औषध मिश्रण केल्याप्रकरणी औषध जप्तीची कारवाई करण्यात आली होती. तसेच कोर्टात खटलाही दाखला केला होता.
 
सध्या एफडीए या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.  टाकलेल्या छाप्यानुसार बनावट औषधे बनवणारी  कंपनी अनेक डुप्लिकेट उत्पादने बनवून विकत असल्याचे उघड झालं आहे. आता यामागे आणखी कोणतं मोठं रॅकेट आहे का याचा तपास सुरू आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget