Bhandara Accident News : पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात; एका तरुणाचा जागीच मृत्यू, तर दोन पोलीस गंभीर
Bhandara News : पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय. तर, दोन पोलीस गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती हाती आलीय.
Bhandara Accident News : पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली आहे. दोन भरधाव वाहन अचानक आमोरासमोर आल्याने झालेल्या या भीषण अपघातात (Accident News) एका तरुणाचा मृत्यू झालाय. तर, दोन पोलीस कर्मचारी गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. ही घटना भंडाऱ्याच्या (Bhandara Accident News) दवडीपार गावाजवळ काल ( 22 एप्रिलच्या) रात्रीच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
कुणाल सुरमवार (वय 30 वर्ष, रा. अड्याळ) असं मृतक तरुणाचं नावं आहे. तर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दिनेश बागडे (वय 29 वर्ष ) आणि मुकेश पांडेकर (वय 40 वर्ष ) यांचा समावेश असून त्यांच्यावर भंडारा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी (Bhandara News) धाव घेतली. त्यानंतर पुढील कारवाई सुरू करत या प्रकरणी कारधा पोलिसांनी संशयित आरोपी पोलीस कर्मचारी मुकेश पांडेकर याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
एका तरुणाचा जागीच मृत्यू, तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर
मुकेश पांडेकर हे पवनी इथं उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहे. तर दिनेश बागडे हे पवनी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहेत. पांडेकर हे पवनी इथून त्यांच्या फोरव्हील्हर गाडीनं भंडाराकडे येत होते तर, दिनेश बागडे हे त्यांचा मित्र मृतक कुणाल सुरमवार यांच्यासह नागपूर इथून पवनीकडं पोलीस गस्त दुचाकीनं जात असताना हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तापस सध्या कारधा पोलीस करत आहेत.
भंडाऱ्यात मध्यरात्री फोडली चक्क सात दुकानं
भंडाऱ्यात काल 22 एप्रिलच्या रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या रिमझिम पाऊस आणि विजयांच्या कडकडाटाचा फायदा घेत चोरट्यांनी शहरातील सात दुकानं फोडल्याची घटना घडली आहे. यात सर्व दुकानांची शटर्स तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम आणि मुद्देमाल लुटून नेल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी या बाबतची माहिती भंडारा पोलिसांना दिली असता त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. मात्र, या घटनेनं व्यापारी वर्गांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ
घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, डॉग स्कॉडसह घटनास्थळी पोहोचले असून ही सर्व दुकाने भंडारा शहरातील विविध भागातील आहेत. किराणा दुकान, स्वीट मार्ट, ज्वेलरी शॉप, मेडिकल स्टोअर्स, पतंजली केंद्र, शीतपेयाचं दुकान इत्यादि चोरट्यांनी डल्ला मारलेल्या दुकानांमध्ये समावेश आहे. नेमका किती रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस या प्रकरणातील चोरट्यांचा शोध सध्या घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या