धक्कादायक! ऑनलाइन जुगारात हरलेल्या पैशांसाठी वृद्ध महिलेला संपवलं; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गूढ उकललं
Dombivli Crime News : डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.
![धक्कादायक! ऑनलाइन जुगारात हरलेल्या पैशांसाठी वृद्ध महिलेला संपवलं; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गूढ उकललं Elderly Woman Finished due to Money Lost in Online Gambling A shocking incident happened at Dombivli Police solved the mystery on the basis of CCTV crime maharashtra marathi news धक्कादायक! ऑनलाइन जुगारात हरलेल्या पैशांसाठी वृद्ध महिलेला संपवलं; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गूढ उकललं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/29239313d95ed014d9cbff28b68990591718457768186892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : डोंबिवली (Dombivli)पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली आहे. या महिलेची हत्या त्यांच्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या तरुणानं हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी तरुणाला अटक केलीय. यश विचारे असं या संशयित आरोपी तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ऑनलाइन जुगारात हरलेल्या पैशांसाठी वृद्ध महिलेला संपवलं
डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर परिसरातील वसंत निवास इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. या इमारतीमध्ये राहणाऱ्या आशा रायकर यांच्या घराचं दार बऱ्याच वेळपासून बाहेरुन बंद होतं. परिणामी शेजाऱ्यांनी दार उघडून आत जाऊन पाहिले तेव्हा त्यांचा मृतदेह घरात पडला होता. त्यांनी तातडीनं ही माहिती पोलिसांना दिली. आशा यांची हत्या झाली की हा अपघात आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आव्हान विष्णू नगर पोलिसांसमोर होतं. त्यांनी दोन तासांच्या तपासानंतर या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला.
कालांतराने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वसंत निवास आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी इमारतीमध्ये बाहेरचं कुणी आलं नाही, हे निष्पन्न झालं. या इमारतीत राहणारा यश विचारे हा तरुण संशयास्पद हालचाल करत होता, हे पोलिसांच्या लक्षात आले.
आजा दारु पिते है, कल शायद जमा होना पडेंगा!
पोलिसांनी यशला ताब्यात घेतले. तो काही बोलण्यास तयार नव्हता. यशला दारुचे व्यसन आहे. विष्णूनगर पोलिसांनी यशच्या काही मित्रांना विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणले. त्यापैकी एका मित्राने सांगितले की, यश याने दुपारीच त्याच्या मोबाईलवर मेसेज केला होता. 'आजा दारु पिते है. कल शायद जमा होना पडेंगा', या मेसेजमुळे तोच मारेकरी असल्याचं स्पष्ट झालं. यशनं ऑनलाईन बेटिंगमध्ये 60 हजार रुपये गमावले होते. त्यामुळे त्याला पैशांची अत्यंत गरज होती.
त्याला दारुचं व्यसन असल्यानं मित्रासोबत दारु पार्टी करायची होती. इमारतीच्या लिफ्टपाशी उभा असताना त्याला आशा रायकर यांच्या गळ्यात आणि कानातले दागिने दिसले. ते पाहून त्याची नियत फिरली. तो आशा यांच्या घरात गेला. त्यानं घरामध्ये त्यांची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई करत या हत्येचे गुढ अखेर समोर आणले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)