एक्स्प्लोर

Chhattisgarh Naxal : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल - नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू; आठ नक्षलवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद 

Chhattisgarh Naxal :छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड भागात सुरक्षा रक्षकांची नक्षलवाद्यांशी (Naxlite) मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत  8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Chhattisgarh Naxal : छत्तीसगढमधील (Chhattisgarh) नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड भागातून मोठी बातमी समोर आली आहे. यात सुरक्षा रक्षकांची नक्षलवाद्यांशी (Naxlite) मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत  8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या परिसरात अद्याप पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू असून नक्षलवाद्यांच्या (Naxal) मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे या अंधाधुंद गोळीबारात एसटीएफचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. सध्या परिसरात अजून ही अभियान सुरू असल्यानें मारले गेलेल्या नक्षल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश

नक्षल्यांच्या गड असलेल्या अबुझमाडच्या कुतुल, फरसाबेदा, कोडामेटा परिसरात मागील दोन दिवसांपासून संयुक्त नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानात नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडा दीआरजी (DRG), एसटीएफ (STF) आणि आयटीबीपी (ITBP) 53व्या कॉर्प्स या संयुक्त कारवाईत सामील आहेत. सध्याघडीला जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच असून पोलिसांच्या कारवाईला अद्याप  8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश

फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच आता पर्यंत सुरक्षा दलाच्या जवानांनी वेगवेगळ्या कारवाईत अनेक नक्षल्यांचे डाव उधाळून अनेकांचा खात्मा केलाय. अशातच छत्तीसगडमध्ये तब्बल 30 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना आणि नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे मानलं जात आहे. 

14 जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकूण 14 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केलं आहे की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget