एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arif Bhujwala arrested by NCB: ड्रग्ज प्रकरणी दाऊदच्या भावाचा जवळचा साथीदार आरिफ भुजवला एनसीबीच्या ताब्यात
आरिफ नुकताच दोन वेळा दुबईला जाऊन आला आहे. आरिफ दुबईमध्ये दाऊदचा ड्रग्जचा व्यावसाय सांभाळणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग डीलर कैलास राजपूतला भेटायला गेला होता.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी ड्रग्जची लॅब एनसीबीकडून उद्ध्वस्त करण्यात आली होती. मात्र आरिफ भुजवाला जो ती लॅब चालवत होता तो मात्र एनसीबीच्या हातून निसटला होता. आता त्याच आरिफ भुजवलाला एनसीबीने रायगडमधून अटक केली असून त्याला आज कोर्टात हजर केले आहे.
आरिफ भुजवालावर आरोप आहे की तो त्याचा साथीदार चिंकू पठाण सोबत मिळून मुंबईच्या मध्यभागी ड्रग्जची लॅब चालवत होता. ज्या वेळी लॅबवर छापा टाकला त्यावेळी एनसीबीने या लॅब मधून 12 किलो ड्रग्ज, 2 कोटी 80 लाख आणि हत्यार जप्त केले होती.
आरिफ बुजवला एक मोठा ड्रग डीलर आहे. एनसीबीद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे दाऊदच्या साम्राज्याला (ड्रग्जचा धंदा) खिंडार पडली आहे. एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार आरिफ भुजवालाला श्रीमंत लोकांप्रमाणे राहायला आवडत असे. मात्र त्याच्या ड्रग्जच्या कामाबद्दल त्याच्या शेजाऱ्यांनाही त्यानी कधी माहिती लागू दिली नाही.
आरिफ नुकताच दोन वेळा दुबईला जाऊन आला आहे. आरिफ दुबईमध्ये दाऊदचा ड्रग्जचा व्यावसाय सांभाळणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग डीलर कैलास राजपूतला भेटायला गेला होता. ज्यामुळे आरिफची दुबई ट्रीप सुद्धा आता एनसीबीच्या रडारवर आहे.आरिफ भुजवाला याला आज कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला चार दिवसांची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आरिफच्या चौकशीतून अजून कुठचे बडे खुलासे होत आहेत हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
आरिफच्या घरातही NCB ला एक स्मिथ वासन कंपनीचे रिव्हाल्वर सापडले आहे. आरिफचे अनेक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज विकणाऱ्या गुन्हेगारांसोबत थेट संबंध होते. तो हा काळाबाजार करून आरामात आपले आयुष्य घालवत होता. याच्या घरात 8 ते 9 महागड्या कारच्या चाव्या सापडल्या आहेत. NCB च्या अधिकाऱ्यांना आरिफच्या ड्रग्ज फॅक्टरीतून 2 ते 3 डायरी सापडल्या आहेत. त्यात त्याने ड्रग्ज संदर्भातले व्यवहार लिहून ठेवले आहेत.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement