एक्स्प्लोर

Drug Case | ड्रग्ज प्रकरणी समीर खान यांच्या चौकशीत एनसीबीकडून धक्कादायक माहिती समोर

उत्तर प्रदेशमध्ये हर्बलच्या नावाखाली गांजाचे मिश्रण करुन ते वितरण करत असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.समीर खान आणि करण यांनी 15 महिन्यांपासून हा ड्रग्जचा काळा व्यवसाय सुरू केल्याचेही एनसीबीने सांगितले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना काल (13 जानेवारी) अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानी आणि समीर खान यांच्या आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे आढळल्याचा दावा एनसीबीने केला आहे. दरम्यान, तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्याचे एनसीबीने सांगितले आहे. समीर खान हा करण सजनानी याचा सहकारी असून या दोघांचा मोठा प्लॅन होता, असंही एनसीबीने म्हटलं आहे.

करण ब्रिटीश नागरिक असल्याने तो राहिला यांच्या अकॉऊंटमधून देवाण-घेवाण करत होते. तर समीर खान यांचे क्रिकेट लीग, फुटबाल लीग आणि सलूनच्या दुकानांची साखळी आहे. करण सिएटलकडून बड्स मागवता होता. गांजाचे 4 ते 5 फ्लेवर आहे, ते मुंबईत आणत होता.

उत्तर प्रदेशातील फॅक्टरीत हर्बलच्या नावाखाली गांजाचे मिश्रण उत्तर प्रदेशातील रामपूर येथे अली नावाच्या व्यक्तीच्या फॅक्टरीत हर्बलच्या नावाखाली गांजाचे मिश्रण केले जात होते. करण आयात केलेल्या बड्स मिसळून त्यांना जॉइंटमध्ये टाकून विकायचा. दरम्यान, रामपूरचा कारखाना मालक अलीचा शोध घेत आहे. परदेशात या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे एनसीबीने म्हटलं आहे. समीर आणि करण यांनी 15 महिन्यांपासून ड्रग्जचा काळा व्यवसाय सुरू केला होता. समीरचे काम ड्रग्जच्या व्यवसायासाठी पैसा पुरवणे होते. या संदर्भात बरेच डिजिटल पुरावे आहेत. ज्यामध्ये चॅट, व्हॉईस नोट आणि कॉल रेकॉर्डिंगही सापडली असल्याचे एनसीबीच्या चौकशीत समोर आले आहे.

नवाब मलिक यांची प्रतिक्रिया दरम्यान जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणावर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कायदा आपलं काम करेल आणि योग्य न्याय होईल. मी कायद्याचा आदर करतो आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे."

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget