(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : मुंबई विमानतळावर 80 कोटी किंमतीच्या 16 किलो ड्रग्जसह आरोपी अटकेत, DRI ची कारवाई
Mumbai Crime : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका नागरिकाला अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्याच्याकडून मुंबई DRI पथकाने 16 किलो हेरॉईन ताब्यात घेतलं आहे. ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 80 कोटी रुपये असल्याचं कळतं.
Mumbai Crime : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) एका नागरिकाला अंमली पदार्थांसह (Drugs)अटक करण्यात आली. मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ही कारवाई केली. बिनू जॉन असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. त्याच्याकडून मुंबई DRI पथकाने 16 किलो हेरॉईन ताब्यात घेतलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीने ट्रॉली बॅगमध्ये बनलेल्या फेक कॅव्हिटीमध्ये ड्रग्ज लपवलं होतं. महसूल गुप्तचर संचालनालयाने 16 किलो उच्चप्रतिचं हेरॉईन ड्रग्ज जप्त केलं. हस्तगत केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 80 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
Maharashtra | Directorate of Revenue Intelligence (DRI), Mumbai arrested a person from Kerala at the airport after seizing 16 kg of high-quality heroin worth over Rs 80 crores, hidden in a fake cavity inside the trolley bag. Case filed under NDPS Act; further probe underway: DRI pic.twitter.com/85ERrXRctz
— ANI (@ANI) October 5, 2022
गुप्त माहितीच्या आधारे DRI ने सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या
DRI ला गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाचं पथक विमानतळावर पोहोचलं. आरोपी विमानतळावर पोहोचताच त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची झाडाझडती केली. त्याच्याकडील वस्तूंचीही तपासणी केली पण त्यात काही सापडलं नाही. पण त्याच्या ट्रॉली बॅग तपासली असता, या बॅगमध्ये बनलेल्या फेक कॅव्हिटीमधून ड्रग्ज जप्त करण्यात आले. यानतंर डीआरआयने NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाख करुन आरोपीला अटक केली.
डीआरआयच्या चौकशीत आरोपीकडून इतर साथीदारांची नावं उघड
आरोपी ड्रग्ज तस्कर बिनू जॉनने चौकशीदरम्यान डीआरआयला सांगितलं की एका परदेशी नागरिकाने त्याला हे ड्रग्ज भारतात नेण्यासाठी एक हजार अमेरिकन डॉलर्स कमिशन म्हणून दिलं होतं. आरोपी जॉनने इतर साथीदारांची नावे देखील उघड केली.
महसूल गुप्तचर संचालनालय आता या नावांची चौकशी करत आहे. तसंच आरोपी बिनू जॉनचा याआधीही भारतातील ड्रग्जच्या तस्करीत सहभाग होता का, याचाही शोध डीआरआय घेत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पोटात दडवल्या ड्रग्जनं भरलेल्या तब्बल 20 कॅप्सूल, संशय आल्यानं झडती; महिला अटकेत