Dhule Crime: सटाणा तालुक्यातील बालिकेवरील अत्याचार प्रकरण, नराधमाला फाशी द्या; धुळ्यात नाभिक समाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रोश
Satana Crime News: सटाणा तालुक्यातील खतमाने येथे एका 10 वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या (Satana Crime News) घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

Satana Crime News: सटाणा तालुक्यातील खतमाने येथे एका 10 वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या (Satana Crime News) घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, संबंधित 70 वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज धुळे (Dhule Crime) शहर नाभिक दुकानदार संघटना आणि सकल नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली.
Dhule Crime: नराधमाला कठोरातील कठोर किंवा फाशीची शिक्षा झाल्यास पीडितेला खरा न्याय मिळेल
सटाणा तालुक्यातील खतमाने येथील एका 70 वर्षीय व्यक्तीने नाभिक समाजातील अवघ्या 10 वर्षांच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद प्रकारामुळे नाभिक समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी आज धुळे शहर विकास संस्था आणि जिल्ह्यातील समस्त नाभिक समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रकरणी सदर 70 वर्षीय आरोपीने लहान बालिकेवर केलेले कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा विकृत नराधमाला कठोरातील कठोर किंवा फाशीची शिक्षा झाल्यास पीडितेला खरा न्याय मिळेल आणि समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल." शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी आग्रही मागणी धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना व सकल नाभिक समाजाने केली आहे.
Dhule Crime: धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणी कोट्यवधींची वसुली करणाऱ्यांवर कारवाईऐवजी बढती?
महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असताना त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप करीत गुन्हा दाखल करण्यात आला होता... धुळ्यातील जिल्हा उद्योग केंद्रात कार्यरत असलेले तत्कालीन अधिकारी व्ही. के. शिवदास यांची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना चक्क महाव्यवस्थापक पदाचे 'बक्षीस' देण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. या प्रकरणी प्रशासनातील त्यांचा ‘शुक्राचार्य’ नेमका कोण? असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे.
व्ही. के. शिवदास यांचा ‘शुक्राचार्य’ कोण?
तसेच धुळे जिल्ह्यात सध्या कापूस, मका आणि कांदा पिकांचा हंगाम सुरू आहे. मात्र, बियाणे आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्या कंपन्या आणि डीलर्स कडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. बोगस बियाणे किंवा निकृष्ट कीटक नाशकांमुळे नुकसान होऊनही संबंधित कंपनी व डीलर वर कृषी विभागाकडून कोणतीही कडक कारवाई होत नाही,त्यांच्यावर कठोर कारवाई करून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात कडक कायदा मंजूर करावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
आणखी वाचा























