Dharashiv News : धक्कादायक! पुलाखाली सापडले दोन पुरुष अन् एका महिलेचा मृतदेह; तुळजापूरच्या बाभळगाव इथं नेमकं काय घडलं?
Dharashiv News : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात एका पुलाखाली तीन मृतदेह आढळून आले आहे. यातील 1 महिला व 2 पुरुषाचे मृतदेह आढळून आले आहेत.
धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात एका पुलाखाली तीन मृतदेह आढळून आले आहे. यातील 1 महिला व 2 पुरुषाचे मृतदेह असल्याची माहिती पुढे आली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत कारवाई सुरू केली आहे. सध्या पोलिसांनी तीनही मृतदेह वर काढले असून पुढील तपास सुरू केला आहे.
घातपात की अपघात? पोलिसांकडून तपास सरू
पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आढळून आलेल्या मृतदेहावरून पोलिसांनी असा अंदाज लावला आहे की हे तीनही मृतदेह तीनदिवसांपूर्वी पाण्यात पडले असावे. दरम्यान ही घटना घातपात आहे की अपघात याचा पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला असता त्याची ओळख पटली असून हे सर्वजण मुरूम येथील आनंदनगर येथील रहिवासी आहेत. सर्वजण दुचाकीवर प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान पाण्यातून दुचाकी देखील बाहेर काढण्यात आली आहे. ही घटना सोलापूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक 65 वर बाबळगाव गावाजवळील घडली आहे. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बेपत्ता झालेल्या महिलेसह नऊ वर्षीय बालिकेचा मृतदेह सापडला
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे असलेल्या साबर वाडीत बेपत्ता महिलेचा नऊ वर्षीय मुलीसह मृतदेह विहरीमध्ये आढळून आलाय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ही महिला शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. ही महिला का घरातून निघून गेली आणि का आत्महत्या केली? यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ही आत्महत्या आहे की घातपात या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या