एक्स्प्लोर

Delhi Girl Drag Case : "हा अपघात नाही, आधी अत्याचार मग हत्या"; पीडितेच्या आईचा आरोप

Delhi Car Accident : मृत मुलीच्या आईने सांगितले की, 'ती घरात एकटी कमावती मुलगी होती. ती इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती आणि कामानिमित्त घराबाहेर पडली होती. रात्री फोन केला, पण तिने फोन उचलला नाही.'

Delhi Girl Dragged to Death : दिल्लीमध्ये (Delhi) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणीला सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनाने फरफटत नेले. या अपघातात तरूणीचा मृत्यू झाला आहे. तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. तरुणीवर अत्याचार करून त्यानंतर मुलीची हत्या करण्यात आली आणि या घटनेला अपघात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप मृत तरुणीच्या आईने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका कारने तरुणीच्या स्कूटीला टक्कर दिल्याने तिचा अपघात झाला, त्यानंतर ती कारच्या चाकामध्ये अडकली आणि कारने तिला सुमारे आठ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले अशी माहिती समोर येत आहे. 

पाच आरोपींनी मद्यधुंद अवस्थेत

मद्यधुंद अवस्थेत असलेले पाच आरोपी कारमधून नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जात होते. त्यांच्या कारखाली येऊन एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्लीत खळबळ पसरली आहे. ही घटना सुलतानपुरी येथील आहे. कार आणि स्कूटीची धडक झाल्यानंतर तरुणी गाडीखाली आली आणि कारने तिला कंझावालापर्यंत फरफटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की यावेळी मुलीचे सर्व कपडे फाटले. पोलिसांना तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांना एवढा मोठा अपघात झाल्याचेही कळले नाही, असे आरोपींनी सांगितले आहे.

'हा अपघात नाही, अत्याचारानंतर मुलीची हत्या'

एबीपी न्यूजने मृत मुलीच्या आईशी संवाद साधला. त्यावेळी आईने सांगितले की, तिची मुलगी घरात एकटीच कमावती होती आणि इव्हेंट मॅनेजमेंट करायची. कामासाठी पंजाबी बाग येथे जात असल्याचे आईला सांगून ती घरातून बाहेर पडली होती. याशिवाय तरुणीने अधिक काही सांगितले नव्हते. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ती घरातून बाहेर पडली. रात्री 9 वाजता आईने तिला फोन केला पण तिचा फोन लागला नाही. रात्री 11 वाजून गेले तरी तिचा फोन सुद्धा आला नाही. यानंतर सकाळी फोन आल्यावर कळले की मुलीचा अपघात झाला आहे. पीडितेच्या आईने सांगितले आहे की, तिला तिच्या मुलीलाही शेवटचे बघू दिले गेले नाही.

दरम्यान, मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 'सकाळी 10  वाजता घरी फोन आला की, मुलीचा अपघात झाला आहे. ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा तेथे दोन मुलांना अटक करण्यात आली होती. घरात ती एकटीच कमावणारी होती, दुसरी कोणी नाही.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Embed widget