एक्स्प्लोर

Delhi Crime CA death case: तोंडात हेलिअम गॅस भरुन स्वत:ला संपवलं, दिल्लीत CA तरुणाचं टोकाचं पाऊल

Delhi CA youth ends life: दिल्लीतील पेशाने सीए असलेल्या तरुणाने अत्यंत भयंकर पद्धतीने स्वत:चा शेवट केला. या तरुणाने स्वत:च्या शरीरात हेलिअम गॅस भरुन घेतला.

Delhi Crime CA suicide case: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक भयंकर घटना घडली आहे. दिल्लीतील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या गोल मार्केट परिसरातील एका हॉटेलमध्ये एका चार्टर्ड अकांऊंटट (Delhi CA Suicide) असलेल्या तरुणाने आत्महत्या (Suicide news) केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या तरुणाचे नाव धीरज कंसल असे असून तो फक्त 25 वर्षांचा होता. धीरज कंसल याने अत्यंत भयानक पद्धतीने स्वत:चे आयुष्य संपवले. पोलिसांना त्याचा मृतदेह अत्यंत विचित्र अवस्थेत सापडला. धीरज कंसल याने एक सुसाईड नोट लिहली होती. यामध्ये त्याने म्हटले आहे की,कृपा करुन माझ्या मृत्यूनंतर दु:खी होऊ नका. मृत्यू ही माझ्या जीवनाचा सर्वोत्तम भाग होता. आत्महत्या करणं वाईट नाही, कारण माझ्यावर कोणाचाही जबाबदारी नव्हती किंवा माझं कोणाशी घट्ट नातं नव्हतं. माझ्यामुळे कोणीही नैराश्यात जाणार नाही, असे धीरज कंसल याने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

धीरज कंसल याने दिल्लीच्या गोल मार्केट परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली. धीरजने स्वत:च्या शरीरात हेलिअम गॅस भरुन आयुष्य संपवले. दिल्लीतील बाराखंबा पोलिसांना त्याचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत बेडवर आढळून आला. धीरजच्या तोंडात एक पाईप होता. 28 जुलैला पोलिसांना हॉटेलमधून फोन आला. धीरजने 20 ते 28 जुलै या काळासाठी एअरबीएनबी अॅपवरुन पहिल्या माळ्यावरील खोली बूक केली होती. चेकआऊट करण्याच्या दिवशी हॉटेलचे कर्मचारी धीरज कंसलच्या खोलीजवळ गेले तेव्हा आतमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे हॉटेलच्या मालकाने पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून घेतले आणि खोलीचा दरवाजा तोडला. आतमध्ये गेल्यानंतर पोलिसांना धीरज कंसला याचा मृतदेह बेडवर पालथा पडलेल्या अवस्थेत दिसला. 

धीरज कंसल याने तोंडावर एक मास्क घातला होता. हा मास्क एका सिलेंडरला जोडला होता. तसेच धीरज याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वत:च्या चेहऱ्याभोवती एक प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळली होती. धीरजने नळीद्वारे सिलेंडरमधील हेलिअम वायू तोंडावाटे शरीरात भरला आणि आत्महत्या केली. धीरज एकटा पडला होता. हे एकटेपण असह्य झाल्यामुळे धीरजने आयुष्य संपवल्याचे सांगितले जाते.

Delhi Suicide news: धीरजच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट सापडली

पोलिसांनी धीरज कंसल याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली. यामध्ये म्हटले आहे की, तुम्हाला माझी फेसबुक पोस्ट मिळाली नाही तर ही सुसाईड नोट मिळेल. मी निघून जात आहे. यासाठी कोणालाही दोषी धरु नये, असे धीरजने चिठ्ठीत म्हटले आहे. धीरज हा त्याच्या घरी एकटा होता. 2003 साली धीरज कंसलच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धीरजच्या आईने दुसरे लग्न केले होते. धीरजला कोणीही भाऊ-बहीण नव्हते.

धीरजने आत्महत्या करण्यासाठी जाणीवपूर्वक हेलिअम गॅसचा वापर केला. हेलिअम गॅस शरीरात गेल्यानंतर श्वास घेणेही अवघड होते. शरीरात हेलिअम गॅस पसरल्यावर लगेच फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि माणसाचा श्वास कोंडला जाऊन मृत्यू होतो. 

आणखी वाचा

मुंबईतील बड्या सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने आयुष्य संपवलं, हुंड्यावरुन सासूचे टोमणे असह्य झाले अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?

व्हिडीओ

Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात
Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Pune Election 2026 BJP VS NCP: भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
Thane Mahangarpalika Election 2026: ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
Amit Deshmukh: भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
Akola crime Hidayat Patel: काँग्रेसच्या हिदायत पटेलांना मशिदीबाहेरच धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, आरोपी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे दोन नेतेही कटात सामील?
काँग्रेसच्या हिदायत पटेलांना मशिदीबाहेरच धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, आरोपी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे दोन नेतेही कटात सामील?
Embed widget