Bhandara : न्यायालयीन महिला बंदीवानाचा उपचारादरम्यान मृत्यू, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
Nagpur News : तब्येत बिघडल्याने महिला बंदीवानाला नागपूरमध्ये उपचारासाठी नेल्यानंतर तिचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
नागपूर : भंडारा जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान नागपूर इथं मृत्यू झाल्याची घटना घडली. महिला बंदीवानाच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत. मीनाक्षी संजय वाडीचार (वय 40) असं या महिला बंदीवानाचं नाव आहे.
मीनाक्षी संजय वाडीचार या भंडारा जिल्हा कारागृहात असताना त्यांची 3 फेब्रुवारीला अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृतीत सुधारणा होतं नसल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी 8 फेब्रुवारीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केलं.
नागपूरमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. न्यायालयीन महिला बंदीवानाच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश भंडारा जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. भंडारा उपविभागीय अधिकारी यांना या चौकशीचे आदेश दिले आहे.
धोतर सोडून अपमानित केल्याने वृद्धाची आत्महत्या
भांडण सुरू असतानाच धोतर सोडल्याने अपमानास्पद वागणूक दिल्याने एका वयोवृद्धाने वीष घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाशिमच्या तळप इथं घडली. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील तळप बु. येथील 75 वर्षीय भास्कर राठोड यांच्याशी 4 जणांनी भांडण करत असतानाच गावातील चौकात मारहाण केली आणि धोतर सोडून अपमानीत केले. त्यातून मानसिक धक्का बसल्याने भास्कर यांनी विष प्राशन केले.
भास्कर यांना प्राथमिक उपचार करून अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना 7 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीविरुद्ध मानोरा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी मीराबाई सीताराम राठोड, विकास सीताराम राठोड, अमर सीताराम राठोड, उज्ज्वला सीताराम राठोड यांच्याविरुद्ध कलम ३०६, ३२३, ५०६, ५९४, ३४ भा.दं. वि.नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास मानोरा पोलिस करीत आहेत.
ही बातमी वाचा: