एक्स्प्लोर

Crime News : व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी 15 सावकारांविरोधात गुन्हा दाखल, 7 अटकेत

Crime News : श्रीगोंद्यातील एका व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी 15 खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Crime News : श्रीगोंदा येथील 'शिवराम वडेवाले'चे मालक शिवराम रमेश वहाडणे आत्महत्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पंधरा सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवराम यांना दिलेल्या कर्जापोटी अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे उकळून त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. 

शिवराम वहाडणे यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत शिवराम यांची पत्नी वंदना वहाडणे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. शिवराम वहाडणे यांच्या वहीमध्ये सावकारांनी दरमहा 10 ते 40 टक्क्यांपर्यंत व्याजाने 10 लाख रुपये दिल्याच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी वहाडणे यांच्या वह्या जप्त केल्या आहेत. एका सावकाराने तर 20 हजार रुपयांच्या कर्जावर दररोज सातशे रुपये व्याज उकळल्याचे समोर आले आहे. त्यातील सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वंदना वहाडणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून  जयसिंग म्हस्के, शहाजी झुंजरुक, कांतीलाल कोकाटे, बापू चव्हाण , अक्षय कैयतके, राहुल धोत्रे, भास्कर सांगळे, प्रवीण जाधव, धीरज भोसले, आकाश भोसले, राहुल खामकर, संतोष शिंदे, विनोद घोडके, मुन्ना काळे, राजू बोरुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या पथकाने जयसिंग म्हस्के, कांतीलाल कोकाटे, अक्षय कैयतके, राहुल धोत्रे, भास्कर सांगळे, राजू बोरुडे, बापू चव्हाण यांना तातडीने अटक केली. इतर आरोपी सावकारांचा शोध सुरू आहे. 

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या खासगी सावकारकीला चाप लावण्यासाठी कायदा तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय, परवानाधारक सावकारांसाठीदेखील नियम तयार करण्यात आले आहे. खासगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याज दराने कर्ज दिले जाते. या कर्जाच्या ओझ्यामुळे अनेकांची मालमत्तादेखील बेकायदेशीरपणे जप्त करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. श्रीगोंद्यातील व्यावसायिकाच्या आत्महत्येनंतर राज्यातील खासगी सावकारीचा जाच पुन्हा एकदा समोर आला आहे. 

कर्ज 2 लाख, वसुली 22 लाखांची, दुकानही हिसकावले; धुळ्यातील प्रकार

एका अवैध सावकाराने  ट्रॅव्हल्स चालकाला दोन लाखांचे कर्ज दिले, त्या बदल्यात 22 लाखांची वसुली केली. तरीदेखील रोजीरोटीचे साधनच असलेले दुकान हिसकावले, दुकान ताब्यात हवे असेल तर 11 लाख रुपये दे, अशी खंडणी मागितली. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकारात सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची फेड करण्यासाठी त्या सावकाराने दुसरा सावकार शोधून दिला. दुसऱ्याच्या कर्जाची फेड करण्यासाठी तिसऱ्या सावकाराकडून पैसे मिळवून दिले, या तिघांनी मिळून ट्रॅव्हल चालकाचे आर्थिक शोषण केल्याचं समोर आले. एवढेच नव्हे तर वेळोवेळी धमक्या दिल्या शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात तीन अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Embed widget